Goat Farming Tips : आपल्या देशात शेती सोबतच पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालनात शेळीचे संगोपन आपल्याकडे सर्वाधिक होते. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या राज्यात उस्मानाबादी, संगमनेरी, बोरर तसेच बेरारी या जातीच्या शेळीचे संगोपन मोठ्या प्रमाणात होत असते.
याव्यतिरिक्त राज्यात अशा अनेक स्थानिक जाती आहेत ज्यांचे संगोपन शेतकरी करतात. जाणकार लोक शेतकरी बांधवांना शेळीपालन व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेळीच्या सुधारित जातींचे पालन करण्याचा सल्ला देत असतात.
दरम्यान आज आपण बेरारी या शेळीच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की बेरारी शेळीची ही एक स्थानिक जात असून या जातीचे संगोपन महाराष्ट्रातील अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात केले जाते.
खरं पाहता अमरावती विभागाला बेरार प्रांत म्हणून ओळखलं जात असे. यामुळे त्या ठिकाणी आढळणाऱ्या किंवा संगोपन केल्या जाणाऱ्या शेळ्यांना बेरारी असं नाव पडलं आहे.
केवळ अमरावती विभागच नाही तर नागपुर विभागात देखील बेरारी शेळी मोठ्या प्रमाणात पाळली जाते. विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यात या शेळीचे वास्तव्य पाहायला मिळते. दरम्यान आज आपण बेरारी शेळीच्या काही विशेषता जाणून घेणार आहोत.
ही शेळी प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळली जाते.
बेरारी शेळी आकाराने मध्यम असते बोकडाचे वजन 36 केजी तर बकरीचे वजन 30 केजी दरम्यान असते.
एका वर्षाच्या बोकडाचे वजन 23 किलोपर्यंत बनते तर बकरीचे वजन हे 20 किलो पर्यंत बनते.
ही जात प्रामुख्याने जुळे करडे देण्यासाठी ओळखली जाते. ही जात एक करडे देखील मोठ्या प्रमाणात देते. तिळे आणि चार करडे देण्याचे देखील या जातीची क्षमता आहे मात्र याचे प्रमाण कमी असते.
ही शेळी दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देत असते.
या शेळीची जात ही दिवसाकाठी 533 ग्रॅम एवढे सरासरी दूध देते. खरं पाहता ही शेळी दूध उत्पादनासाठी पाळली जातच नाही.