Goa Tourist Spot : गोवा हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. गोव्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामध्ये विदेशातील पर्यटकांची संख्या विशेष उल्लेखनीय असते. गोवा हे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण केंद्र बनत चालले आहे. गोव्याला लाभलेला समुद्रकिनारा, गोव्याची खाद्य संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य, गोव्याचे भौगोलिक स्थान या सर्व पार्श्वभूमीवर हे एक पर्यटकांचे हॉट फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशन बनले आहे.
यामुळे जर तुम्ही ही गोव्याला ट्रीप प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण गोव्यातील अशा काही स्थळांबाबत जाणून घेणार आहोत ज्या स्थळांना भेट दिली नाही तर कदाचित तुमची गोवा ट्रिप कम्प्लीट होऊ शकत नाही.
खरंतर सध्या ऑक्टोबर हिटचा प्रत्यय येत आहे. ऑक्टोबर हिट मुळे नागरिक घामाघूम होत आहेत. वाढत्या उकाड्यामुळे वीकेंडला फिरायला निघणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जर तुम्हीही वीकेंडला फिरायचा प्लॅन केला असेल तर तुम्ही गोव्याला भेट देऊ शकता.
गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती
कलंगुट बीच: कलंगुट बीच गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. जर तुम्हाला बीचवर अर्थात समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आवडत असेल तर तुम्ही या बीचला नक्कीच भेट दिली पाहिजे. इथे जगभरातील पर्यटक हजेरी लावतात. यामुळे तुम्हाला इथे आपल्या पार्टनर सोबत किंवा परिवारासमवेत कॉलिटी टाइम स्पेंड करता येणार आहे. सोनेरी वाळू, स्वच्छ निळे पाणी ही या समुद्रकिनाऱ्याची खास ओळख आहे. इथं संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करण्यासाठी भरपूर ऍक्टिव्हिटीज देखील करता येतात.
अगुआडा किल्ला : जर तुम्हाला किल्ल्यांवर भटकंती करायला आवडत असेल तर गोव्याला गेल्याच क्षणी अग्वाडा किल्ला गाठा आणि आपल्या ट्रिपचा मनमुराद आनंद लुटा. मिळालेल्या माहितीनुसार, फोर्ट अगुआडा हा १७ व्या शतकातील पोर्तुगीज किल्ला आहे जो सिंक्वेरिम बीचवर आहे. इथे तुम्हाला अरबी समुद्राचे आश्चर्यकारक दृश्य बघायला मिळते. हे ठिकाण गोव्याच्या इतिहासाबाबत खूपच रंजक माहिती देते. जर आपणास गोव्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
बॅसिलिका ऑफ बॉम जिझस : गोव्यात विविध चर्च तुम्हाला पाहायला मिळतील. द बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे देखील गोव्यातील एक महत्त्वाचे चर्च आहे. विशेष बाब अशी की हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. यामुळे गोव्याला तुम्ही कधी गेलात तर या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या. तुमच्या मनाला यामुळे मोठी शांती मिळणार आहे.
गोव्याचे बटरफ्लाय कंझर्व्हेटरी : तुम्ही जर गोव्याला कधी ट्रिप प्लॅन केली तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या. फुलपाखरांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांना जवळून पाहण्यासाठी गोव्याचे बटरफ्लाय कंझर्व्हेटरी हे एक उत्तम ठिकाण आहे. या कंझर्व्हेटरीमध्ये जगभरातील विविध प्रकारची फुलपाखरे आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसह आणि कुटुंबांसह कधी गोव्याला फिरायला निघाला तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. असे केल्यास तुमची ट्रिप सार्थकी लागेल.
दूध सागर धबधबा : गोव्याला गेलात आणि या धबधब्याला भेट दिली नाही तर तुम्ही गोव्याला गेलाच नाहीत असं समजा. हा देशातील सर्वात उंचीचा धबधबा म्हणूनही ओळखला जातो. जर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कॉलिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर दूध सागर धबधबा हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. गोव्यातील हा धबधबा राजधानी पणजी पासून हाकेच्या अंतरावर स्थित आहे. यामुळे जर कधी गोव्याला गेला तर इथे नक्की जा. मात्र इथे गेल्यानंतर थोडी काळजी घेणे जरुरीची आहे. येथे रिस्की ऍक्टिव्हिटी करू नये.