Marathi News : भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपदा असून निसर्गाने भरभरून असे सौंदर्य दिलेले आहे. तुम्ही उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पाहिले तर भारतामध्ये प्रत्येक राज्यात हिरवेगार व घनदाट जंगले आपल्याला दिसून येतात व यामध्ये विविध प्रकारची वनसंपदा व वन्यजीव संपदा देखील आपल्याला दिसून येते. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात जास्त जंगले असून वनक्षेत्र जास्त आहे.
त्यामुळे साहजिकच भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे देखील आहेत. तसेच भारतातील अनेक राज्यांमध्ये अभयारण्य व जंगले देखील असून त्यातील अनेक अभयारण्य हे पर्यटकांसाठी खुले आहेत.
या अनुषंगाने सध्या उन्हाळा सुरू झाला असून या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्यापैकी बरेच व्यक्ती विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्याच्या संदर्भात प्लॅन बनवतात व यामध्ये बरेच जण जंगल सफारीचा देखील आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात.
त्यामुळे या लेखात आपण भारतातील अशा काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत जे जंगल सफारीकरिता उत्तम असून पर्यटनाचा एक अद्भुत आनंद देऊ शकतात. अशाच महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती या लेखात घेऊ.
जंगल सफारी करता भारतातील ही ठिकाणी आहेत महत्त्वाचे
1- जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान- जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात लोकप्रिय उद्यान असून ते वाघांच्या विविध प्रकारच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. वाघांच्या अनेक जाती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. या उद्यानाला देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुटुंबासोबत तुम्ही या ठिकाणी जर फिरायला जाल तर उन्हाळ्याची सुट्टी तुमची सार्थकी लागेल. तसेच तुम्ही या उद्यानामध्ये जीप सफारीच्या माध्यमातून अनेक वन्य प्राणी पाहू शकतात. मार्च ते मे या महिन्याच्या कालावधीत या उद्यानाला भेट देणे खूप फायद्याचे ठरेल.
2- पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन वन- सुंदरबन जंगल हे रॉयल बंगाल टायगर साठी पूर्ण जगात प्रसिद्ध असून हे भारतातील सर्वात मोठे आणि धोकादायक जंगल म्हणून देखील ओळखले जाते. हे भारत आणि बांगलादेशच्या मध्ये वसलेली जंगल असून गंगा नदीच्या काठावर आहे. सुंदरबन जंगलामध्ये बिबट्या, हत्ती तसेच वनगाय, वाघ, मगरी इत्यादी अनेक प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे खाऱ्या पाण्यातील मगरी देखील या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.
3- कान्हा नॅशनल पार्क( उद्यान)- कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यांमध्ये असून ते घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. रेनडियर या नामशेष होत असलेल्या प्राण्यांच्या प्रजाती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील व त्यासोबत जंगल सफारीचा देखील आनंद तुम्हाला या ठिकाणी घेता येतो. भारतातील हे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान असून ट्रेकिंग करिता देखील हे प्रसिद्ध आहे.