आले हे आरोग्यदायी जीवनासाठी महत्त्वाच्या मसाल्यां पैकी एक आहे. आल्याचा उपयोग औषध आणि सौंदर्याचा घटक म्हणून केला जातो. आल्याच्या सेवनाने हिवाळ्यातील सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते. आल्याचे तेल , पावडर इत्यादींचा वापर औषधांमध्ये देखील होतो. आल्याचे आयुर्वेदामध्ये खास महत्त्व आहे.
आले शेती नियोजन , उत्पादन आणि नफा :- शेतकऱ्यांना फायदेशीर शेती करायची असेल तर आले शेती हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. आले या पिकाच्या लागवडीत प्रचंड क्षमता आहे. आले शेतीत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते. भारताचा जगात आले उत्पादनात 7 वा क्रमांक लागतो.
भारतात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश , मेघालय , आसाम , ओरिसा , गुजरात आणि कर्नाटक आले उत्पादक राज्ये आहेत. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती सरासरी पाऊस आणि आद्रता लक्षात घेता दक्षिण – पश्चिम आणि ईशान्य भागातही आले लागवड साठी अनुकूल माती आणि वातावरण आहे.
आले पिकासाठी लाल , वालुकामय , चिकन माती किंवा उत्तम निचरा असलेल्या जमिनीवर आल्याचे उत्तम पीक येते. त्यासाठी येतील जमिनीचा पीएच मूल्य 5.6 ते 6.5 असावे.
आले पिकासाठी 20 ते 30 अंश सेल्सियस तापमान अनुकूल असते. आले पिकाचे उत्पादन मिळण्यासाठी 8-9 महिने कालावधी लागतो.
भारतात आले लागवडीचा कालावधी ज्या त्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या हंगामात लागवड केला जाते.उत्तर भारतात प्रामुख्याने 15 मे ते 30 मे तर , दक्षिण भारतात मार्च – एप्रिल मध्ये पेरणी केली जाते. लागवडी अगोदर शेताची चांगल्या प्रकारे मशागत करून घ्यावी.
लागवडीचे शेत 2 वेळा नांगरून घ्यावे. वाफे काढते वेळी लहान लहान आकाराचे वाफे तयार करावेत. सिंचनाच्या सोयी नुसार शेताचे लहान विभागात विभागणी करून लागवड करावी. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित आल्याच्या जाती आहेत.
त्यात प्रामुख्याने मारन , रिओ दी जानेरो , वायनाड लोकल ,वायनाड मानोन , थोडा , वुल्लुनातु ,अर्नाडू , तुफांगिया , रिओ दि जानेरोसाठी टेली रोल इ इत्यादी.
आले जास्त लावू नये. आल्याची संख्या जास्त झाल्यास उत्पादन कमी निघते.
आल्याच्या बिया जमिनीत ३ ते ४ इंच खोलवर लावाव्यात.आल्याची पेरणी ही पावसाळ्यात केली जाते त्यामुळे सिंचनाची जास्त गरज लागत नाही.
पेरणीच्या वेळी शेणखत 25 ते 30 टन हेक्टरी खत गादी वाफेवर पसरावे. आले शेती कमीत – कमी खर्चात जास्तीत – जास्त नफा मिळवून देते.
शास्त्रोक्त पद्धतीने आले लागवड केली असता भरपूर नफा मिळतो.आणि हेक्टरी सरासरी 150 ते 200 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
एका एकरात सुमारे 1 लाख 20 हजारांपर्यंत खर्च येतो. तर एका एकरात 120 क्विंटल उत्पादन मिळते.
आल्याच्या बाजारभावानुसार 40 ते 50 रुपये एक एकरात चाळीस दाराने लागवड केल्यास सुमारे 4 लाख 80 हजार रुपयांचे उत्पादन मिळू शकते.