Gharkul Yojana Maharashtra News : काल राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने काल नऊ महत्वाचे शासन निर्णय घेतले आहेत.
या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान, कालच्या या महत्वाच्या बैठकीत घरकुल लाभार्थ्यांसाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील बेघर लोकांसाठी अनेक घरकुल योजना राबवल्या जात आहेत.
यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी मोदी आवास योजना अशा योजना राबवल्या जात आहेत.
याशिवाय पंतप्रधान आवास योजना देखील राबवली जात आहे. एवढेच नाही तर घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवणे हेतू देखील एक महत्त्वाची योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य असे या योजनेचे नाव आहे. या अंतर्गत घरकुल बांधकामांसाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी हेतू अनुदान दिले जात आहे.
खरंतर आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना 50 हजार रुपये एवढे अनुदान मिळत होते. मात्र या रकमेतून सर्वसामान्यांना जागा खरेदी करता येत नसल्याने या रकमेत वाढ करण्याची मागणी होती.
याच पार्श्वभूमीवर काल शिंदे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत आणखी 50 हजाराची वाढ करण्यात आली आहे.
म्हणजेच आता या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी हेतू एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. परिणामी संबंधित लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वास्तविक, ग्रामपंचायत क्षेत्रात वाढत्या नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना दिला जाणाऱ्या अनुदानात वाढ झाली पाहिजे अशी मागणी होती.
परिणामी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत वाढीव अनुदान पुरवले जाणार आहे. निश्चितच या निर्णयाचा संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे यात शंकाच नाही.