FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र असे असले तरी आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडीला विशेष महत्त्व आहे. बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
विशेष म्हणजे देशातील प्रमुख बँका एफडी करणाऱ्यांना चांगले व्याज देखील पुरवत आहेत. एसबीआय बँकेचे एमडी अश्विनी कुमार तिवारी यांनी भविष्यात एफडीवरील व्याजदर आणखी वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.
अर्थातच येणारा काळ हा एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळवून देणार आहे. दरम्यान, आज आपण ज्येष्ठ नागरिकांना एफडीसाठी सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी पाहणार आहोत.
खरे तर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी बँकेकडून अधिक व्याजदर पुरवले जात आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा पर्याय सर्वोत्कृष्ट ठरत आहे.
FD साठी ज्येष्ठ नागरिकांना सर्वोत्कृष्ट व्याजदर देणाऱ्या बँका
HDFC Bank : देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत एचडीएफसीचा समावेश होतो. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. एवढेच नाही तर एफडीसाठी देखील बँकेकडून चांगले व्याज ऑफर केले जात आहे. ही बँक जेष्ठ नागरिकांना अधिकचे व्याज ऑफर करत आहेत.
मीडिया रिपोर्ट नुसार एचडीएफसी बँक एक वर्षांपासून ते 15 महिन्यांपर्यंतच्या एफडी साठी ज्येष्ठ नागरिकांना 7.10% एवढे व्याज ऑफर करत आहे. या बँकेकडून एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या FD साठी 7.1 ते 7.75% एवढे व्याज दिले जात आहे.
ICICI Bank : ICICI Bank ही खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते. या बँकेकडून एफडीसाठी ज्येष्ठ नागरिकांना चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. ही बँक एक वर्ष ते 15 महिने कालावधीच्या एफडीसाठी 7.25% एवढे व्याज देत आहे.
SBI Bank : देशातील 12 पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँक पैकी एक बँक म्हणजेच एसबीआय. या बँकेकडूनही आपल्या ग्राहकांना एफडी साठी चांगले व्याजदर पुरवले जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी एफडीवर 7.3 ते 7.5% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
बँक ऑफ बडोदा : ही सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी चांगले व्याज देत आहे. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 7.35 ते 7.75 टक्के एवढे व्याज दिले जात आहे.
बँक ऑफ बडोदा तिरंगा प्लस या एफ डी स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेकडून 7.65% एवढे व्याज पुरवले जात आहे.