जमीन नापीक झालीय, कमी उत्पन्न मिळतंय; मग ‘या’ पिकांची शेती सुरू करा, लाखोत होणार कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Tips : भारतात फार पूर्वीपासून शेती केली जात आहे. यासोबतच आपल्या देशात पशुपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेतीशी निगडित उद्योगधंदे करण्याकडे अलीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पिकांच्या चांगल्या विक्रमी उत्पादनासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जात आहे.

रासायनिक खतांच्या वापरामुळे सुरुवातीच्या काही काळात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले. मात्र यानंतर त्यांच्या उत्पादनात मोठी घट आली. रासायनिक खतांच्या अंदाधुंद वापरामुळे जमीन नापीक बनत चालली आहे. यामुळे अशा जमिनीत बागायती पिकांपासून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही.

अनेकदा तर पिकासाठी केलेला खर्च देखील भरून काढता येत नाही. मात्र असेही काही पिके आहेत जी नापीक जमीनीत लावून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवता येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापीक जमिनीचा योग्य पद्धतीने वापर करून लाखो रुपयांची कमाई केली आहे.

लेमनग्रास फार्मिंग : लेमन ग्रास एक औषधी वनस्पती आहे. या पिकाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. अर्थातच तुलनेने कमी असलेल्या सुपीक जमिनीतही हे पिक वाढू शकते. लेमन ग्रास पासून ऑइल तयार केले जाते.

जें की परफ्युम, साबण, निरमा, डिटर्जेंट, तेल, हेअर ऑइल, मच्छर लोशन, डोकेदुखीचे औषध, कॉस्मेटिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात येते. अर्थातच औषधे बनवण्यासाठी आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीज मध्ये लेमन ग्रास ऑइल चा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

यामुळे लेमन ग्रास ऑइल ला बाजारात चांगला भाव मिळतो. एका आकडेवारीनुसार भारत दरवर्षी 700 टन एवढे लेमन ग्रास ऑइल उत्पादित करतो. विशेष म्हणजे या लेमनग्रास ऑईलची देशांतर्गत मोठी मागणी आहे शिवाय परदेशातही हे तेल पाठवले जाते.

म्हणजेच लेमन ग्रास ऑइल ची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील या ठिकाणी होत आहे. यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. लेमन ग्रास लागवड करण्यासाठी कोणतेही हवामान पोषक ठरते.

म्हणजेच या पिकाची बारा महिने लागवड केली जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे एकदा लागवड केली की या पिकातून जवळपास सहा वर्षांपर्यंत उत्पादन मिळवता येते. यामुळे एकदा लागवड आणि वर्षानुवर्षी या पिकातून चांगला नफा शेतकऱ्यांना मिळवता येऊ शकतो.

झाडांची लागवड : जर जमीन नापीक बनली असेल म्हणजेच तुलनेने कमी सुपीक जमीन असेल तर अशा जमिनीत झाडांची लागवड केली जाऊ. चंदन, मलबार नीम, सागवान, निलगिरी, बांबू यांसारख्या झाडांची लागवड केली जाऊ शकते.

याशिवाय खजूर पिकाची देखील अशा जमिनीत शेती केले जाऊ शकते. चंदन, मलबार नीम, सागवान, निलगिरी यांसारख्या झाडांच्या लाकडाला बाजारात मोठी मागणी असते आणि चांगला भाव मिळतो यामुळे अशा झाडांची लागवड देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा