मित्रांनो भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे देशाची जीडीपी (GDP) ही सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातील बहुतांश शेतकरी (Farmer) हवामानावर आधारित शेती करण्यावर अधिक भर देत असतात.
भारतीय शेती (Indian Farming) ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे शेतकरी बांधव मे महिन्याच्या सुरुवातीपासून खरीप पिकांच्या (Kharip Season) पेरणीच्या तयारीला लागतात. पाऊस येण्याअगोदरच शेतकरी बांधवांची खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी पूर्वमशागत (Pre-cultivation) करण्याकडे लगबग वाढते.
अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मे महिन्यात शेतकरी कोणत्या पिकांची पेरणी करून चांगला नफा मिळवू शकतो याविषयी सर्वस्वी माहिती सांगणार आहोत.
शेतकरी मित्रांनो आपण मे महिन्यात मका, ज्वारी, हायब्रीड नेपियर घास याची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.
या पिकांची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही पिके साधारण अवघ्या दोन महिन्यांचा कालावधीत तयार होतात. अशा परिस्थितीत या पिकांच्या मदतीने शेतकरी कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकतात. आले, हळद यांसारख्या कंदवर्गीय पिकांची पेरणी देखील याच महिन्यात केली जाते.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही पिके त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखली जातात. अनेक आजारांमध्ये या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो.
या औषधी वनस्पतींचे सेवन करण्याची शिफारस डॉक्टर देखील करत असतात. या पिकांची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही पिके नेहमीच आंतरपीक म्हणून घेतले जातात.
याशिवाय आले, हळद आणि अरबी या पिकाला तूर, सोयाबीन, मूग, उडीद या उन्हाळी हंगामातील पिकांमध्ये आंतरपीक म्हणून लावले जातात.
यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळत असतो. आंतरपीक म्हणून लागवड केली जात असल्याने या पिकांसाठी वेगळी शेतजमीन अटकवण्याची काही गरज नाही.
याशिवाय आंतरपीक आणि मुख्य पिकातून दुप्पट नफाही शेतकऱ्यांना मिळू शकतो. शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जिथे आरबी, आले, हळद पेरणी करत आहेत तिथे सावलीची चांगली व्यवस्था असावी.
याशिवाय शेतात पाण्याचा निचरा देखील चांगला झाला पाहिजे. तसेच वेळोवेळी पिकांची निंदनी करून पिकांना स्वच्छ ठेवले पाहिजे. जेणेकरून या पिकातून त्यांना चांगला नफा मिळेल.
ही तीन पिके तयार होण्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे आणि पदार्थांमध्ये वापरल्यामुळे त्यांची मागणी बारामाही बाजार पेठेत राहत असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत या पिकांची लागवड करून शेतकरी अल्पावधीतच चांगली कमाई करू शकतात.