गेल्या काही दिवसात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.
तर कृषी क्षेत्रासंबंधित अनेक योजनांच्या घोषणा ही केल्या. तर या योजनांमार्फत शेतकऱ्याला सक्षम करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे देखील सांगण्यात आले.
अधिवेशनात घोषणा जरी झाली असली तरी 50 हजार रुपयाची रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.त्याबाबत संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देण्यात आली.
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या प्रोत्साहन पर मदत देण्याची घोषणा मागील काळात झाली होती.
पण कोरोना स्थितीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत देता आली नाही. तर आता 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आसून त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तरी याबाबत काही नियम व अटी देखील आहे. त्या शेतकऱ्यांना माहित नसल्याने त्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.आणि कोणत्या काळात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली जाणार?
प्रत्यक्ष मदत रक्कम केव्हा जमा होणार अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे अर्थमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रक्रियेत दिली.
याबाबत अजित पवार म्हणाले, सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018- 19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर ही 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
तर महिला शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांच्या योजनेतील 30 टक्के सहभाग वाढवून 50 टक्के पर्यंत केला आहे. त्याचा मुख्य हेतू महिलांना शेती क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचा आहे.