sugar news :ह्यावर्षी अतिरिक्त उस प्रश्न निर्माण झाला असून परिणामी साखरेच्या उत्पादनात ही वाढ झाली आहे. तर साखरेला यावर्षी चांगले भाव मिळतील पण पुढील वर्षात मात्र बेकारीचे दिवस येतील असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तर वाढलेल्या साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाला पर्याय म्हणून साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉल वाढवले पाहीजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले, साखर आणि इथेनॉलला चांगले दिवस आले आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी आता अन्नदाता नाही तर उर्जादाता बनवायची गरज आहे. इंधन खपत मोठ्या प्रमाणात वाढली असून परिणामी प्रदुषणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण किती वाढले आहे. याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे.
तर टोयाटो, सुझुकी आणि टाटा या तीनही महत्वाच्या कंपन्या फ्लेक्स इंजिन बनवायला तयार आहेत. जैवइंधन पंप स्टेशन खोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात तीन इथेनॉल स्टेशनच उद्घाटन पंतप्रधान यांनी केले आहे. पण इथेनॉल भरायला कोणी येत नसल्याचे गडकरी म्हणाले.तर येणाऱ्या काळात अनेक बदल होणार असून ही एक काळाची गरज आहे.
यामध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. संरक्षण विभागातील यंत्रणांना इथेनॉल वापरण्याच्या संदर्भात माझी चर्चा सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तर भारत सरकारने बांबुपासुन इथेनॉल बनवले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.