Cilantro Farming: लातूर जिल्ह्यातील (Latur District) शेतकरी बांधव सध्या कोथिंबीर लागवडीकडे आपला मोर्चा वळवत असल्याचे बघायला मिळत आहे.
जिल्ह्यात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांच्या (Farmers) विहिरीत अजूनही मुबलक असा पाण्याचा साठा उपलब्ध असून उन्हाळी हंगामातील (Summer Season) पिकातून या पाण्यात उत्पादन घेता येणे शक्य आहे.
यामुळे जिल्ह्यातील पानगाव परिसरात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची पेरणी (Coriander Farming) करत आहेत. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोथिंबीर हे एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे पीक अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होत असते.
कोथिंबीर चे पीक (Cilantro Crop) केवळ 40 दिवसात उत्पादन देण्यास तयार होत असते यामुळे अल्प कालावधीत शेतकरी बांधवांना यातून चांगला नफा मिळत असतो.
पानगाव परिसरात यावर्षीच मुबलक असा पाण्याचा साठा बघायला मिळत आहे नाहीतर यापूर्वी खरीप हंगाम आपटताच व रब्बी हंगामातील एक पीक घेताच विहिरीतील पाणी तळ गाठत असे.
यामुळे साधारणता पाणगाव परिसरात यादी केवळ मुबलक पाण्याचा साठा असलेलेचं शेतकरी कोथिंबिरीची पेरणी करत असत. मात्र यावर्षी सर्व शेतकऱ्यांकडे पुरेसा असा पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवड करण्यास पसंती दर्शवली आहे.
यामुळे पानगाव परिसर आगामी काही दिवसात कोथिंबिरीचे हब बनले तर आश्चर्य करण्याचे काही कारण नाही. यावर्षी विहिरींना मुबलक पाणी असल्याने परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीन राजमा यांसारख्या पिकांची लागवड केली आहे.
मात्र या पिकांना काढणीसाठी अधिक कालावधी लागत असल्याने शेतकरी बांधवांनी अल्प कालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या कोथिंबीर पिकाला विशेष पसंती दर्शवली आहे. यामुळे येत्या काही दिवसात पानगाव कोथिंबीरीचे आगार म्हणून ओळखले जाईल असा आशावाद येथील शेतकरी आता वर्तवित आहेत.