krushimarathi : राज्यातील कापसाला गेल्या काही दिवसापासून उच्चांकी दर मिळत आसून फरदड कापसालाही चांगला भाव मिळत आहे. तर कापसाच्या वाढलेल्या भावाचा फायदा शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाला ही होत आहे.
कापसाचे वाढलेली उच्चांकी दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण सध्या वाढलेली मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळेच हे शक्य झाले आहे.तर शेतकऱ्यांनी वाढलेल्या भावामुळे अखेरच्या टप्प्यातील साठवलेला कापूस विकला आणि आता त्याचाच फायदा व्यापाऱ्यांना झाला.
यंदा सोयाबीनला वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला जास्त पसंती दिली त्यामुळे कापसाचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटले आणि उत्पादन घटल्यामुळे मागणी वाढली परिणामी कापसाला सोन्याचा भाव मिळू लागला आहे.
अकोट बाजार समितीमध्ये जे गेल्या 50 वर्षामध्ये झाले नाही ते यंदा घडले आहे. सोमवारी 11 हजार 845 असा विक्रमी दर कापसाला मिळाला आहे. यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेली कापूस लागवड आणि
मिळालेले विक्रमी दर यामुळे पुन्हा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागा कडून सांगण्यात आला आहे.
ह्या वर्षी हवामानातील बदलाचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन आणि कापूस या पिकांना बसला तर कापूस पीक अंतिम टप्यात असतानाच ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन कमी झाले.
घटलेले कापसाचे उत्पादनच दर वाढीस कारणीभूत ठरले.कोरोना आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तर सध्या कापसाला मिळणाऱ्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.