मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अवलियाने सुरु केली शेती ! मशरूम लागवडीतून मिळवला जबरदस्त नफा, पहा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : शेती म्हणजे फक्त हाडाचे काम आहे, शेतीमधून चांगला नफा मिळत नाही असे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. वास्तविकता देखील तशीच काहीशी आहे. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांसमोर वेगवेगळी आव्हाने उभी राहत आहेत. या वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे तसेच शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतीमधून शेतकऱ्यांना खूप कष्ट करूनही फारसा नफा मिळत नाही.

यामुळे अनेकांचा शेतीवरचा विश्वास कमी होत चालला आहे. अनेकांनी शेती सोडून शहरात जाऊन रोजगाराच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. शेतीला रामराम ठोकत अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे. मात्र असेही अनेक नवयुवक तरुण, तरुणी आहेत ज्यांनी शेतीमध्ये आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करत चांगली कमाई करून दाखवली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान आज आपण अशाच एका अवलिया शेतकरी दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. आज आपण पुणे जिल्ह्यातील अमर पडवळ यांचे यशोगाथा पाहणार आहोत. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मौजे राजुर येथील अमर पडवळ हे मराठी चित्रपटसृष्टीत काम करतात. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत बहुमूल्य अशी कामगिरी केली आहे.

सिनेमॅटोग्राफर, सहाय्यक दिग्दर्शक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपटात आपली जबाबदारी पार पाडली आहे. रौंदळ, पंचायत, स्क्रू ड्रायव्हर, बोधी यांसारख्या चित्रपटात त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. मात्र चित्रपटसृष्टीत सक्रिय असतानाही या अवलियाने शेतीमध्ये आपला पाय रुजवला आहे. खरंतर कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आला होता. यामुळे चित्रपटसृष्टी देखील विरान झाली होती.

याचा फटका पडवळ यांना देखील बसला. जवळपास अडीच ते तीन वर्षे पडवळ घरातच बसून होते. यावेळी मग त्यांनी विविध शेती पूरक व्यवसायाचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी त्यांनी मशरूम शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या व्यवसायासाठी जागा लागणार होती. जागा त्यांच्याकडे नव्हती म्हणून त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकाकडून शेड भाड्याने घेतले. यामध्ये त्यांनी मशरूमची लागवड केली.

नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी मशरूम शेती सुरु केली. निर्वाणा फ्रेश नामक कंपनी स्थापित करून त्यांनी या व्यवसायात चांगलीच झेप घेतली आहे. पडवळ गेल्या दोन वर्षांपासून मशरूम शेतीत गुंतलेले आहेत. ऑईस्टर मशरूम सारख्या वेगवेगळ्या मशरूमच्या जातीचे ते यशस्वी उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे उत्पादित केलेल्या मशरूमची अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर विक्री सुरु आहे.

पडवळ यांनी सुरू केलेल्या मशरूम शेतीत त्यांच्या उच्चशिक्षित धर्मपत्नी अक्षता देखील मोलाचा वाटा उचलत आहेत. सुरुवातीला पडवळ यांनी दहा किलो मशरूम बियाणे आणून याची लागवड केली होती. त्यावेळी प्रति किलोला तीन किलो मशरूम त्यांना मिळाले होते. यासाठी त्यांना 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च आला होता. दरम्यान हा सारा खर्च वजा करून त्यांना 30,000 पर्यंतचे उत्पन्न मिळाले होते.

मशरूम लागवड केल्यानंतर वीस दिवसातच मशरूम तयार झाले होते. म्हणजेच लागवड केल्यानंतर अल्पकालावधीतच त्यांना यातून उत्पन्न मिळाले. म्हणून हा नफा पाहून त्यांनी आता 80 किलो मशरूम बियाणे आणले आहे. याची त्यांनी लागवड केली असून आता यातूनही त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. निश्चितच पडवळ यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.