शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! गाय गोठा, शेळी-कुक्कुटपालन शेड योजनेसाठी अर्ज सुरू; मिळणार 2 लाख 31 हजाराचे अनुदान, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ख्याती प्राप्त आहे. आपल्या देशात जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्या ही शेती व शेती आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. यामुळे भारताच्या जीडीपीत म्हणजेच अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचा मोठा वाटा आहे.

देशभरातील शेतकरी बांधव शेती हा मुख्य व्यवसाय करतात. यासोबतच शेतकरी बांधव पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात करतात. पूर्वी पशुपालन हा व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून केला जात असे. परंतु अलीकडे पशुपालन हा व्यवसाय देखील व्यवसायिक स्तरावर केला जाऊ लागला आहे.

व्यावसायिक पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळत आहे. पशुपालनात गाई म्हशींचे संगोपन मोठ्या प्रमाणात केले जाते. यासोबतच शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन, ससे पालन इत्यादी व्यवसाय देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहेत.

दरम्यान या व्यवसायातून चांगले उत्पादन जर मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने पशुपालन करणे आवश्यक असल्याचे मत जाणकार लोक व्यक्त करतात. यामुळे जाणकार लोक पशुपालकांना बंदिस्त पद्धतीने पशुपालन करण्याचा सल्ला देतात.

बंदिस्त पशुपालन म्हणजेच गोठ्यात किंवा शेडमध्ये पशुपालन करणे होय. पण बंदिस्त पशुपालन करताना लागणारे हे शेड किंवा गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो. यामुळे गायीचा गोठा किंवा शेळी पालन तसेच कुकूटपालनासाठी शेड तयार करणे प्रत्येकच शेतकऱ्याला जमत नाही.

ज्या शेतकऱ्यांकडे भांडवल असते ते शेतकरी गाईसाठी गोठा किंवा शेळीपालन आणि कुक्कुटपालनासाठी शेड तयार करतात. पण ज्या शेतकऱ्यांकडे पैशांची उपलब्धता नसते त्यांना इच्छा असूनही गोठा किंवा शेड तयार करता येत नाही.

दरम्यान पशुपालक शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाच्या माध्यमातून गाय, म्हैस गोठा तयार करण्यासाठी आणि शेळीपालन तसेच कुक्कुटपालनासाठी शेड तयार करण्यासाठी अनुदान पुरवले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण शासनाच्या या योजनेबाबत थोडक्यात सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

किती अनुदान मिळते ?

पशुपालक शेतकऱ्यांना गाय म्हैस गोठा तयार करण्यासाठी तसेच शेळीपालन किंवा कुक्कुटपालनासाठी शेड तयार करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून गाय, म्हैस गोठा बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार पर्यंतचे अनुदान पुरवले जाते. तसेच शेळीपालन आणि कुक्कुटपालन शेडसाठी एक लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.

गाय गोठा बनवण्यासाठी असे मिळते अनुदान 

या अंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी एक गाई गोठा बनवण्यासाठी 77188 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. 6 पेक्षा जास्त गुरे असतील तर दोन गोठ्यासाठी 154376 रुपयांपर्यंतचे अनुदान पुरवले जात आहे. तसेच 12 पेक्षा जास्त गुरे असल्यास तीन गोठ्यांसाठी 231564 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.

शेळीपालनासाठी असे मिळते अनुदान

या योजनेअंतर्गत 2 ते 10 शेळ्या असतील तर एक शेडसाठी 49,284 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. 20 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर दोन शेडसाठी 98,568 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. तसेच 30 पेक्षा जास्त शेळ्या असतील तर तीन शेडसाठी 14,7852 रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेअंतर्गत पुरवले जात आहे.

कुक्कुटपालनासाठी असे मिळते अनुदान 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून 100 पक्षी असतील तर एक शेडला 49,760 पर्यंतचे अनुदान पुरवले जात आहे  तसेच जर 150 पेक्षा जास्त पक्षी असतील तर दोन शेड साठी 99,520 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा