शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शेतमालाचा हमीभाव वाढवला, नवीन वर्षापूर्वीच मोदी सरकारने दिली मोठी भेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News : नवीन वर्षाच्या पूर्वीच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या तीन दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.

लोक आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31st डिसेंबरच्या पार्टीचे नियोजन करण्यात व्यस्त आहेत. अशातच आता केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.

सरकारने खोबऱ्याच्या एमएसपीत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नारळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी देखील डिसेंबर महिन्यातच खोबऱ्याच्या एमएसपीत सुधारणा करण्यात आली होती.

या वर्षी देखील डिसेंबर महिन्यातच खोबऱ्याची एम एस पी अर्थातच हमीभाव वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सरत्या वर्षात नारळ उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.

याच्या हमीभावात प्रतिक्विंटल अडीचशे ते तीनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानुसार आता खोबऱ्याला 11160 रुपये प्रति क्विंटल ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या (CCEA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, योग्य आणि सरासरी गुणवत्तेच्या (FAQ) गोटा खोबऱ्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 250 ची वाढ करण्यात आली आहे.

यानुसार आता गोटा खोबऱ्याला 12,000 रुपये प्रतिक्विंटल एवढी एम एस पी मिळणार आहे. तसेच पुढील वर्षासाठी मिलिंग खोबऱ्याची एम एस पी 300 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

आता मिलिंग खोबऱ्याला 11,160 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव मिळणार आहे. दरम्यान शासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे.

नारळ उत्पादक शेतकरी बांधवांनी एम एस पी मध्ये वाढ झाली असल्याने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तथापि काही शेतकऱ्यांनी एमएसपी मध्ये आणखी वाढ झाली पाहिजे होती अशी खंत बोलून दाखवली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा