Famous Travel Destination In India : भारताला विस्तृत अशा समुद्रकिनाऱ्याची भेट मिळाली आहे. यामुळे भारताच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. भौगोलिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भारताला तिन्ही बाजूने समुद्र लाभला असल्याने आपल्या देशाचे सौंदर्य इतर देशांच्या तुलनेत खूपच खास आहे.
हेच कारण आहे की भारतातील सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक आपल्या देशात येत असतात. दरवर्षी आपल्या देशात लाखोंच्या संख्येने विदेशी पर्यटक भेटी देतात. आपल्या देशातील पर्यटक देखील देशातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देतात. दरम्यान जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात कुठे ट्रिप काढणार असाल, ऑक्टोबर महिन्यात कुठे फिरण्याच प्लॅन असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी देशातील काही महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्याबाबत माहिती घेऊन हजर झालो आहोत.
खरंतर ऑक्टोबर मध्ये तापमानात खूप मोठी वाढ होत असते. या महिन्यात पावसाळा ऋतू संपून हिवाळा ऋतूला सुरुवात होते. म्हणजेच हा संक्रमणाचा महिना असतो यामुळे या महिन्यात तापमानात देखील वाढ होते. अशा परिस्थितीत या ऑक्टोबर हिटच्या काळात जर तुम्ही कुठे ट्रिप काढत असाल तर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर काढायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला थंड वातावरण अनुभवायला मिळेल आणि ऑक्टोबर हिट पासून तुम्हाला दिलासा मिळेल.
दरम्यान आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्याची माहिती देणार आहोत, जिथे जाऊन तुम्ही तुमच्या ट्रिपचा कुटुंबासमवेत मनमुराद आनंद लुटू शकता.
मरीना बीच : देशातील सर्वात निसर्गरम्य असा हा समुद्रकिनारा आहे. हा एक प्रसिद्ध समुद्रकिनारा असून येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. चेन्नई शहरातील हे सर्वात मोठे पर्यटन स्थळ आहे. या समुद्रकिनाऱ्याची एकूण 13 किलोमीटर एवढी लांबी आहे. या समुद्रकिनाऱ्याची एक विशेषता म्हणजे हा जगातील सर्वाधिक लांबीचा दुसरा समुद्रकिनारा आहे तर भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा आहे. यामुळे या बीचवर नेहमीच पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. जर तुम्हीही ऑक्टोबरच्या महिन्यात कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
कलंगुट बीच, गोवा : खरंतर गोवा हे देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. गोव्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. मात्र गोव्यातील कलंगुट बीच पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. या समुद्रकिनाऱ्यालगत तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, वॉटर सर्फीग, जेट स्काइंग यांसारख्या ऍक्टिव्हिटी देखील करता येणार आहेत. यामुळे गोव्यात फिरण्यासाठी येणारे पर्यटक या बीचला एकदा आवर्जून भेट देतात. जर तुम्हीही गोव्याला गेलात तर या व्यक्तीला नक्कीच भेट द्या.
पुरी बीच, ओडिषा : ओडिसा हे देखील देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. ओडिशा राज्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत. परंतु ओडिषा मधील पुरी बीचची बातच काही और आहे. या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासारखा असतो. जर तुम्हीही ओडिशाला गेलात तर या बीचला नक्की भेट द्या.
वरकला बीच केरळ : हा बीच अरबी समुद्राचे दर्शन घडवतो. या बीचवरून अरबी समुद्राचे दर्शन घडते. अरबी समुद्राचे सौंदर्य पाहण्यासाठी हा बीच खूपच लोकप्रिय आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला ताडाचे उंच झाड पाहायला मिळतात. जर तुम्ही तुमच्या परिवारात समवेत एखाद्या थंड हवेच्या आणि शांत ठिकाणी जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकते.
तारकर्ली, महाराष्ट्र : महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. संपूर्ण कोकण समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. जर तुम्हीही एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर मालवणच्या दक्षिणेत बसलेल्या तारकर्ली या समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकता. हे ठिकाण मुंबईपासून 546 किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्हाला विस्तृत समुद्रकिनारा पाहायला मिळतो.