Famous Tourist Spot In Maharashtra : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात थोडीशी घट आली आहे. यामुळे राज्यातील जनतेला थोड्या प्रमाणात ऑक्टोबर हीट पासून दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही राज्यातील काही भागात ऑक्टोबर हिट ची झळ पाहायला मिळत आहे.
ऑक्टोबर हीटमुळे लोक बेजार झाली आहेत. यामुळे अनेकांनी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखला आहे. तर काही लोक या विकेंडला फिरायला जाण्यासाठी तयारी करत आहेत. जर तुमचाही या विकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण विकेंडला फिरता येतील अशा काही राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण कोकणातील लोकप्रिय पर्यटन स्थळे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालूया आणि या वीकेंडला फिरता येतील अशी कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
विकेंडला फिरण्यासारखी राज्यातील प्रसिद्ध पिकनिक स्पॉट
अलिबाग : कोकण म्हटलं तर सर्वप्रथम नारळाच्या उंचच उंच बागा, विस्तृत समुद्रकिनारा आणि कोकणातील लाल माती यांचे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यासमोर तरळते. कोकणात अशी अनेक ठिकाणी आहेत जी फिरण्यासारखी आहेत. यामध्ये अलिबागचा देखील समावेश होतो. जर तुम्ही विकेंडला फिरायचा प्लॅन बनवत असाल तर अलिबाग हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. येथील समुद्रकिनारा किल्ला आणि मंदिर तुमच्या मनाला भुरळ घालणार आहे. अलिबाग बीच सोबतच तुम्ही किहीम, मुरुड आणि काशीद बीच ला देखील भेट देऊ शकणार आहात.
गणपतीपुळे : जर तुम्ही विकेंडला परिवारात समवेत ट्रीप प्लॅन करत असाल तर गणपतीपुळे हे तुमच्यासाठी एक सर्वोत्कृष्ट ठिकाण ठरणार आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला भावणार आहे. गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. जर तुम्हीही कोकणात फिरवण्यासाठी निघत असाल तर गणपतीपुळे नक्कीच एक्सप्लोर करा. जर तुम्ही गणपतीपुळे टाळले तर कदाचित तुम्हाला कोकण ट्रिप अपूर्ण भासू शकते.
आंबोली : कोकणातील आंबोली येथीलच धबधबा हा खूपच प्रसिद्ध आहे. येथील धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेने टिपण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. धबधब्यासोबतच हे ठिकाण एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते. यामुळे जर तुम्ही नेहमीच्या रूटीन लाईफला कंटाळला असाल आणि वीकेंडला कुठे जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर आंबोली हे हिल स्टेशन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय राहणार आहे.