पत्नीसोबत किंवा पार्टनरसोबत ट्रिपला जाण्याचा प्लॅन करताय ? ‘ही’ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट, प्रवासापूर्वी एकदा बघाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Famous Tourist Spot In India : आपल्यापैकी अनेकांना फिरण्याची आवड असते. जर तुम्हालाही फिरण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण भारतातील काही प्रसिद्ध हिल स्टेशन्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा पार्टनर सोबत ट्रीपला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर या हिलस्टेशनबाबत तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवी. खरंतर, मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. काही राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे.

शा स्थितीत आता काही ठिकाणी थंडी पडायला सुरुवात होणार आहे. खरतर ऑक्टोबर हा महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात पावसाळा ऋतू संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते. अशा स्थितीत या महिन्यांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात आद्रता तयार होते, उकाडा वाढतो.

अशा स्थितीत जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये थंड हवामान असलेल्या ठिकाणाला भेट देण्याचा प्लॅन बनवत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही पर्यायाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मनाली : मनाली हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी येतात. विदेशातूनही हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. जर तुम्हीही हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी या हिल स्टेशनचा पर्याय चांगला राहू शकतो. विशेषतः जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत ट्रिपची योजना आखत असाल तर मनाली या हिल स्टेशनला तुम्ही भेट देऊ शकता. जोडप्यांमध्ये हे हिल स्टेशन विशेष प्रसिद्ध आहे.

शिमला : जर तुम्ही हिमाचल प्रदेश मध्ये मनाली येथे फिरायला गेले तर हिमाचल प्रदेशमधीलच शिमला या ठिकाणालाही एकदा अवश्य भेट द्या. हे हिल स्टेशन स्वर्गापेक्षा कमी नाही. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर सिमला हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. इथले सुंदर पर्वत, नद्या, धबधबे आणि शांत वातावरण तुमच्या मनाला निश्चितच प्रसन्न करणार आहे.

नैनिताल : हे ठिकाण उत्तराखंड येथे स्थित आहे. हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून तुमच्या पत्नीसोबत तुम्ही या ठिकाणाला एकदा आवर्जून भेट दिली पाहिजे. इथली बोटिंग कायमच तुमच्या आठवणीत राहणार आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते. या ठिकाणाला पृथ्वीवरील स्वर्ग अशी उपमा देण्यात आली आहे. हे स्थळ स्वर्गाची उणीव भासू देत नाही. झेलम नदीजवळ वसलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. जर तुम्हालाही नैसर्गिक सौंदर्य आपल्या नजरेत कैद करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या ठिकाणास भेट देऊ शकता आणि मनमुराद आनंद लुटू शकता. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा