भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळे; वर्षभर असते पर्यटकांची गर्दी, फिरायला जाण्याआधी एकदा वाचाच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Famous Tourist Place In India : भारत आपल्या संस्कृतीमुळे आणि जैवविविधतेमुळे संपूर्ण जगात ओळखला जातो. भारतीय संस्कृती ही जगातल्या प्राचीनतम संस्कृतींपैकी एक आहे. आपल्या देशात फिरण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. यामुळे आपल्या देशात दरवर्षी जगभरातील कानाकोपऱ्यातून पर्यटक हजेरी लावतात.

जर तुम्हीही देशांतर्गत आपल्या परिवारासमवेत फिरायचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर आपल्या देशात फिरण्यासारखी शेकडो, हजारो ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणाचे आपले एक खास वैशिष्ट्य आहे. पण आज आपण अशा काही मोजक्या ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक पसंतीची पर्यटन स्थळे कोणती?

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ताजमहाल : ताजमहाल हे भारतातील एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. याचा वर्ल्ड हेरिटेज मध्ये समावेश करण्यात आला आहे. हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. यामुळे दरवर्षी ताजमहाल पाहण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने पर्यटक राजधानी दिल्लीला भेट देतात. यामुळे जर तुम्हीही तुमच्या परिवारासमवेत कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर राजधानी दिल्लीतील ताजमहल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकते.

लाल किल्ला : लाल किल्ला ही देखील भारतातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल किल्ल्याचे महत्व राजकारणात देखील अभूतपूर्व आहे. कारण की या ऐतिहासिक वास्तूवर दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी तिरंगा ध्वज मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. असे सांगितले जाते की, शहाजहाने 1648 मध्ये लाल किल्ला बांधला होता. हा किल्ला बांधण्यासाठी लाल वाळूचा दगड वापरण्यात आला आहे.

यामुळे ही संपूर्ण वास्तू लाल भडक आहे. या वास्तूची सुंदरता पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडते. ही ऐतिहासिक वास्तू सुमारे दोन किलोमीटरच्या परिघात पसरलेली आहे. या वास्तूळा दोन मुख्य दरवाजे आहेत, ज्यांची नावे ‘लाहोर गेट’ आणि ‘दिल्ली गेट’ अशी ठेवण्यात आली आहेत. ही वास्तू भारताच्या पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास दर्शवते. यामुळे एकदा लाल किल्ला पाहण्यासाठी आवर्जून गेले पाहिजे.

आमेर किल्ला, जयपूर : जर तुम्ही राजस्थानमध्ये फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आमेर किल्ल्याला एकदा भेट देणे आवश्यक आहे. आमेर किल्ला पाहिला नाही तर कदाचित तुमची राजस्थानची ट्रिप अपूर्णच राहिल. मिळालेल्या माहितीनुसार हा किल्ला 1592 मध्ये बांधला गेला आहे. किल्ल्यावरील जलेब चॉक, शिला देवी मंदिर या गोष्टी विशेष पाहण्यासारख्या आहेत. यासोबतच या किल्ल्यात एक मोठा हॉल आहे, ज्याला दिवाण-ए-आम म्हणतात. भारताच्या गौरवमय इतिहासाचा हा किल्ला साक्ष आहे.

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी म्हणून मुंबई संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. खरंतर मुंबई मधला कोपरान-कोपरा फिरण्यासारखा आणि पाहण्यासारखा आहे. मायानगरी मुंबईमध्ये अशी काही ठिकाणी आहेत जी मुंबई सोडून संपूर्ण जगाच्या नकाशावर तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाहीत.

मायानगरी, बॉलीवूडनगरी आणि स्वप्ननगरी म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्राच्या हजारो अप्रतिम ठिकाणांपैकी एक आहे. गेटवे ऑफ इंडिया 26 मीटर उंचीचा आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा गेट पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लाखोंच्या संख्येने पर्यटक मुंबईला भेट देतात. त्यामुळे जर तुम्हीही राजधानी मुंबईत फिरण्यासाठी जात असाल तर गेटवे ऑफ इंडियाला एकदा नक्कीच भेट द्या.