कमी पैशात विदेशात फिरायचय ? ‘या’ जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट द्या, लो बजेट मध्ये फॉरेन ट्रिपचा आनंद घ्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Famous Tourist Destination In The World : आपल्यापैकी अनेकांना भटकंती करायला खूप आवडते. वेगवेगळ्या ठिकाणाला भेट देऊन तेथील संस्कृती समजून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. अनेकांना विदेशात फिरायचे असते. जर तुमचही असेच स्वप्न असेल मात्र बजेटमुळे तुम्हाला विदेशवारी करता येत नसेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत जिथे जाऊन तुम्ही कमी पैशात फॉरेन ट्रिपचा आनंद घेऊ शकणार आहात. मित्रांनो, जर आपणांस फॉरेन ट्रिपला जायचे असेल पण कमी पैशामुळे तुम्हाला फॉरेनला जाणे अशक्य होत असेल तर तुम्ही व्हिएतनामला भेट दिली पाहिजे. येथे तुम्हाला निळा समुद्र, छोटे छोटे डोंगर आणि हिरवीगार भातशेती पाहता येणार आहे.

खरतर व्हिएतनाम हा एक छोटासा देश आहे. या देशाला नेत्र दीपक असे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. हा देश खूपच सुंदर आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमी बजेटमध्ये या सुंदर देशाला भेट देऊ शकता. येथे जाऊन तुम्ही तुमचे विदेशात फिरण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

विशेष म्हणजे व्हिएतनामला भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. तुम्ही देखील या देशाला भेट देऊ शकता. व्हिएतनाम हे अतिशय स्वस्त पर्यटन ठिकाण आहे, जिथे तुम्ही अगदी सहजतेने पोहोचू शकणार आहात आणि आपल्या ट्रिपचा आनंद घेऊ शकणार आहात. तुम्ही फक्त 1 ते 2 लाखांमध्ये व्हिएतनामला भेट देऊ शकणार आहात.

व्हिएतनाममध्ये कोणत्या पर्यटन स्थळांना भेट द्याल ?

Halong Bay- हे व्हिएतनाममधील सर्वात सुंदर ठिकाण आहे. जर तुम्ही कधी व्हिएतनाम फिरायला गेलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला ‘बे ऑफ डिसेंडिंग ड्रॅगन्स’ असेही म्हणतात. येथे चारही बाजूंनी लहानमोठ्या पर्वतांनी वेढलेला निळा समुद्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कॉलिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.

हनोई – हे व्हिएतनाममधील आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे शहर व्हिएतनामची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर लाल नदीच्या काठावर वसलेले आहे. हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. येथे तुम्हाला जुन्या इमारती, सोनेरी पॅगोडा, संग्रहालये आणि पारंपारिक बाजारपेठ पाहायला मिळणार आहे. या शहरातील खाद्य संस्कृती देखील तुम्हाला विशेष आवडणार आहे. यामुळे जर तुम्ही व्हिएतनामला गेलात तर या शहराला नक्की भेट द्या. येथे जाऊन तुम्ही कमी पैशात फॉरेन ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

Hoi An – हे व्हिएतनामचे आणखी एक महत्त्वाचे शहर आणि एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या शहराची गणना आशियातील सर्वात जुन्या शहरांमध्ये केली जात आहे. या शहरात तुम्हाला व्हिएतनामच्या प्राचीन संस्कृतीची आणि सभ्यतेची झलक पाहायला मिळणार आहे. येथे जाऊन तुम्ही तुमच्या फॉरेन ट्रिपचा मनमुराद आनंद लुटू शकणार आहात. तुम्हाला गर्दीपासून दूर शांतता हवी असेल तर इथं नक्कीच भेट द्या. या शहराला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. यामुळे तुम्हीही स्वस्तात कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर या शहराला एकदा नक्कीच भेट द्या.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा