Electricity Reduce Technique : अलीकडे विजेचा वापर मोठा वाढला आहे. पूर्वी लोक घरात चिमणी, कंदीलचा उजेड करत असत. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. आता लाईट, बल्बचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, विजेचे वाढलेले दर सर्वसामान्यांसाठी त्रासदायक सिद्ध होत आहेत.
वीज वितरक कंपनीच्या माध्यमातून विजेचे युनिटचे दर वाढवण्यात आले आहेत. यामुळे वीज ग्राहकांना अधिक वीजबिल भरावे लागत आहे. सहाजिकच यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. पण आता सर्वसामान्यांचे वीज बिलाचे टेन्शन दूर होणार आहे. आता शून्य रुपये वीजबिलात बल्ब चालवता येणार आहे.
आता निश्चितच तुम्हाला नेमकं शून्य रुपये विज बिलात लाईट कसा चालवला जाऊ शकतो याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया की हे यंत्र नेमकं कोणत आहे आणि हे यंत्र काम कसं करत.
काय आहे हे यंत्र
खरंतर आज आपण सौर उर्जेवर चालणाऱ्या एलईडी लाईट बाबत जाणून घेणार आहोत. हा एलईडी बल्ब सौरऊर्जेवर चालतो यामुळे शून्य रुपये वीजबिलात बल्ब चालवता येणार आहे. साहजिकच यामुळे सर्वसामान्यांचा मोठा पैसा वाचणार आहे. या बल्बची किंमत मात्र 199 रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत राहणार आहे.
म्हणजेच केवळ 199 रुपयांचा खर्च केला तर वीजबिल नं भरताही नागरिकांना बल्ब चालवता येणाऱ आहे. या लाईटची विशेषता म्हणजे हा लाईट चालू करावा लागत नाही किंवा बंद ही करावा लागत नाही. अर्थातच हा लाईट ऑटोमॅटिक चालू किंवा बंद होतो.
रात्र झाली की हा लाईट ऑटोमॅटिक ऑन होतो आणि दिवस उजाडला की हा लाईट ऑटोमॅटिक ऑफ होतो. हा लाईट सहा तास चार्ज झाल्यानंतर 18 तास पर्यंत सतत चालतो. विशेष म्हणजे हा लाईट पाण्यातही खराब होत नाही. जर आपणास हा लाईट घ्यायचा असेल तर आपण अमेझॉन सारख्या वेबसाईटवरून हा बल्ब ऑनलाईन खरेदी करू शकता.