Electric Bull Viral Agriculture News : पूर्वी शेती ही कष्टाची होती. कष्टकरी बळीराजाला शेतीमध्ये मोठी मेहनत घ्यावी लागत असे. आधी शेतीच्या कामांसाठी बैलजोडीचा उपयोग होत असे. अगदी पूर्वमशागतीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंत आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर बाजारात शेतमाल नेईपर्यंत सर्व ठिकाणी बैल जोडीचा उपयोग होत असे.
यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांना शेती करताना मोठी मेहनत घ्यावी लागत असे. आता मात्र यंत्राचे युग आले आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या साह्याने शेतीचा व्यवसाय आता आधीच्या तुलनेत अधिक सोपा बनला आहे. शेतीमध्ये आता ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतलेली आहे. यामुळे घंटो का काम मिनटो मे होत आहे. मात्र असे असले तरी प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करता येणे अशक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ट्रॅक्टर खरेदी करण्यासारखी नाहीये.
याच्यावर उपाय म्हणून आता कृषी संशोधकांनी नवीन छोट्या छोट्या यंत्रांची निर्मिती केलेली आहे. असंच एक यंत्र आहे इलेक्ट्रिक बैल. या इलेक्ट्रिक बैलाचे चंद्रपूर येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात नुकतेच सादरीकरण झाले आहे.
विशेष म्हणजे कृषी महोत्सवात सादर झालेला हा इलेक्ट्रिक बैल संपूर्ण महोत्सवाचे आकर्षक केंद्र ठरला आहे. खरे तर हा इलेक्ट्रिक बैल एक इलेक्ट्रिक व्हेईकल आहे. ज्याच्या मदतीने शेतीची जवळपास सर्वच कामे पूर्ण करता येत आहेत. यामुळे याला इलेक्ट्रिक बैल असे नाव पडले आहे.
आता याचं नावाने हे इलेक्ट्रिक व्हेईकल शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनले आहे. हा चार्जिंग वर चालणारा इलेक्ट्रिक बैल शेतीची सर्वच कामे करण्यास सक्षम आहे. बैल जोडी प्रमाणे हा इलेक्ट्रिक बैल शेतीतील कामे करतो. हा चार्जिंग वर चालतो.
एकेरी चार्ज करण्यासाठी अडीच तास आणि दुहेरी चार्ज करण्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक बैलाचा एका दिवसाचा खर्च हा फक्त 50 ते 60 रुपयांचा आहे. 60 रुपये खर्च करून या इलेक्ट्रिक बैलाच्या माध्यमातून शेतीची सर्व कामे करता येणे शक्य आहे.
यामुळे कृषी महोत्सवात या इलेक्ट्रिक बैलाला पाहण्यासाठी आणि याच्या विशेषता जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. हे इलेक्ट्रिक बैल सर्व आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज आहे. यात ब्लूटूथ, एफ एम रेडिओ, कॅमेरा यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
या यंत्रात जीपीएस प्रणाली देखील बसवण्यात आलेली आहे. हा बैल कोणत्याही यंत्राला जोडता येऊ शकतो आणि यामुळे शेतीची कामे सोपी होत आहेत. या इलेक्ट्रिक बैलाची किंमत साडेतीन लाख रुपये एवढी आहे मात्र यासाठी शासनाकडून 50% पर्यंतचे अनुदान देखील मिळते.
यामुळे हे यंत्र कमी पैशात खरेदी करून शेतकरी बांधव शेतीची कामे अगदी सहजतेने करू शकणार आहेत. ट्रॅक्टर ज्यां प्रमाणे शेतीकामे करतो तशीच कामे हा देखील इलेक्ट्रिक बैल करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.