Drumstick Farming : शेवगा या पिकाची महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. शेवग्याची लागवड प्रामुख्याने शेंग्याच्या उत्पादनासाठी होते. याशिवाय शेवग्याचा पाला देखील खूपच गुणकारी असून याचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे याच्या पाल्याला देखील बाजारात मोठी मागणी असते.
शेवगा आणि पाला विक्री करून शेतकऱ्यांना या पिकातून चांगली कमाई होत आहे. दुहेरी उत्पादन देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते मात्र या पिकाच्या सुधारित जातींची लागवड करणे विशेष आवश्यक आहे. यामुळे आज आपण शेवगा पिकाच्या दोन सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण ज्या शेवग्याच्या जातींची माहिती पाहणार आहोत त्या जाती कोरडवाहू भागात आणि शुष्क प्रदेशात देखील चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या सुधारित जातींची माहिती.
थार हर्षा : ही शेवग्याची एक सुधारित जात असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीच्या शेवग्याला गडद हिरवे पाने येतात. या जातीच्या शेवगा पिकाला फळधारणा उशिराने होते. या जातीच्या शेवग्याला एका वर्षात 314 शेंगा लागतात.
म्हणजेच हेक्टरी 53 ते 54 टन उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा संशोधकांनी केलेला आहे. परिणामी या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
ही जात कोरडवाहू भागात लागवडीसाठी अनुकूल असल्याचे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. या जातीच्या शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते.
अर्थातच मानवी आरोग्यासाठी या जातीचा शेवगा हा खूपच फायदेशीर समजला जातो. परिणामी बाजारांमध्ये याला चांगली मागणी असते आणि चांगला भाव सुद्धा मिळतो.
थार तेजस : ही देखील शेवग्याची एक सुधारित जात आहे. याची लागवड देशातील अनेक प्रमुख शेवगा उत्पादक राज्यांमध्ये पाहायला मिळते. या जातीच्या शेवग्याची लांबी 45 ते 48 cm एवढी राहते.
या जातीच्या शेवग्याची लागवड कोरडवाहू भागात देखील होऊ शकते असा दावा केला जातो. विशेष म्हणजे कोरडवाहू परिस्थितीमध्ये देखील या जातीच्या शेवगा पिकातून चांगली कमाई होत आहे.
निश्चितच कोरडवाहू भागात देखील या जातीची लागवड केली जात असल्याने शेवग्याची ही सुधारित जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.