शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार अनुदान ! तुम्हाला मिळणार की नाही ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drone Subsidy : देशात गेल्या काही वर्षांपासून मध्ये शेती व्यवसायात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी नवीन आधुनिक पद्धतीने शेती करण्याला विशेष महत्व दिले जात आहे.

आधुनिक पद्धतीने शेती सुरू केल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू लागले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील कमी होऊ लागला आहे.

आधुनिक पद्धतीने शेती करतांना आता शेतकरी बांधव यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. दरम्यान यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे योजना देखील राबवल्या जात आहेत.

नुकतेच केंद्र शासनाने ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदी करण्यासाठी महिला बचत गटांना आठ लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे याशिवाय इतरही अन्य शेतकऱ्यांना आणि कृषी संस्थांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान पुरवले जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण ड्रोन खरेदीसाठी कोण-कोणत्या घटकातील शेतकऱ्यांना अनुदान मिळते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोणाला मिळणार अनुदान

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान पुरवले जाणार आहे. या प्रशिक्षण संस्थांना आणि विद्यापीठांना कमाल दहा लाख रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.

म्हणजे ड्रोनची किंमत दहा लाखांपेक्षा अधिक असल्यास उर्वरित रक्कम ही कृषी प्रशिक्षण संस्थेला किंवा कृषी विद्यापीठांना वहन करावी लागणार आहे.

याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या अर्थातच एफ पी ओ यांना देखील ड्रोन खरेदीसाठी 75% पर्यंतचे अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना, महिला शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच ईशान्येकडील राज्यांमधील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 50% अनुदान किंवा कमाल पाच लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

देशातील इतर भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र ड्रोन खरेदीसाठी 40% अनुदान किंवा कमाल 4 लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा