Weight Loss Tips :- धावपळीचे दैनंदिन आयुष्य, प्रचंड प्रमाणात असलेला ताणतणाव, वेळेवर जेवण नसणे व संतुलित आहाराची कमतरता, बाहेर असताना कायम जंक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींमुळे वाढत्या वजनाची समस्या कित्येक लोकांना त्रस्त करत असून या वाढत्या वजनामुळे प्रचंड प्रमाणात पोट वाढल्याच्या देखील समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे.
त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेच्या उपाययोजना करताना आपल्याला बरेच जण दिसून येतात. तरीदेखील जास्त फरक पडताना आपल्याला दिसून येत नाही. बरेचजण जिम तसेच डायट प्लान सारख्या उपाययोजनांपासून तर प्रचंड प्रमाणात महागडे उपचार देखील करतात. परंतु तरी देखील सकारात्मक परिणाम दिसून येत नाही.
परंतु जर ताबडतोब भोजन कमी करायचे असेल तर दुधीचा रस पिणे खूप फायद्याचे ठरू शकते याबद्दलचे महत्त्वाची माहिती योगगुरू स्वामी रामदेव यांनी अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेली आहे. दुधीचा रस जर एक महिन्याभर घेतला तर अनेक लोकांचे दहा ते पंधरा किलो वजन कमी झाले असल्याचा दावा देखील स्वामी रामदेव यांनी केलेला आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण 12% असते व त्याची चव इतर भाज्यांपेक्षा खूप वेगळी असते. एवढेच नाही तर दुधी भोपळ्यामध्ये फॉस्फरस, प्रथिने तसेच कॅल्शियम व लोह यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते.
त्यामुळे तुम्ही नियमितपणे व्यायाम किंवा शारीरिक कष्ट केल्यानंतर दररोज 100 ग्रॅम दुधी भोपळ्याचा रस पिला तर पोट भरल्यासारखे राहते व भूक लागत नाही व वजन नियंत्रणात राहते.
अशाप्रकारे करा दुधीचा वापर व कमी करा वजन
1- दुधीचा रस- स्वामी रामदेव हे वजन कमी करण्याकरिता दुधीचा रस पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते जर रोज दिवसाची सुरुवात आणि शेवट दुधी भोपळ्याचा रस पिऊन केली तर फायदा मिळतो व मधल्या वेळेत देखील जमले तर त्याचे सेवन करावे. दुधीचा रस बनवायचा असेल तर यामध्ये तुळस, कोथिंबीर तसेच पुदिना व लिंबू घातला तर त्याची चव अधिक वाढते व तुम्हाला जास्त फायदा होतो.
2- दुधीचे सॅलड- तुम्ही दुधीच्या बियांचा भाग काढून त्याचे सॅलड बनवू शकता. तसेच काकडी व कोबी बारीक किसून ते दही सोबत देखील खाऊ शकतात.
3- दुधीची भाजी- जर तुम्ही नाचणीची भाकर सोबत दुधीची भाजी खाल्ली तर ते फायद्याचे ठरते. तसेच या व्यतिरिक्त तुम्ही एक तासभर वजन कमी करण्याकरिता सकाळी कपाल भारती तसेच सायकलिंग सारखे व्यायाम देखील करू शकतात. अशा प्रकारचे जीवन पद्धती तुम्ही दोन महिने फॉलो केली तरी तुमचे वजन कमी व्हायला मदत होते.