Insect control :शेतात कीटकांमुळे रोगराईचा फैलाव जास्त प्रमाणात होत असतो.त्यामुळे त्याचा परिणाम हा पिकाच्या उत्पादनावर दिसून येतो. तर वेळेत किट नियंत्रणासाठी
फेरोमोन सापळे वापरून किडी पासून पिकांचे संरक्षण करता येते.
कीटक हे त्याच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचे गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडून स्वजातीयांशी सुसंवाद साधतात.तर हाच गंध कृत्रिम पद्धतीने तयार करून गंध सापळ्यात मादी पतंगाच्या वासा द्वारे कामा गंधाद्वारे या पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे नियंत्रण करता येते.
तर गंध सापळे वापरताना पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1ते 1.5 फूट उंची ठेवून वापरावे तसेच या सापळ्यातील संबंधित पिकावरील संबंधित किडीकरिता वापरली जाणारी कामगंध गोळी साधारणपणे वीस दिवसानंतर बदलावी.
किडींच्या सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रात सर्वसाधारणपणे पाच कामगंध सापळे पुरेसे आहेत.तर कपाशी, तूर, हरभरा, सोयाबीन, वांगी, भेंडी यांसारख्या पिकातील पतंग वर्गीय किडीची कामगंध सापळे वापरून कीट नियंत्रण करणे सोपे जाते.