गेल्या दोन वर्षांपासून बळीराजाला अतिवृष्टीचा मुकाबला करावा लागत असल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने बळीराजाची आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली असताना कर्जांचे हप्ते, शेतीसाठी लागणारा खर्च, मुला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न समोर असताना महावितरणकडून शेती पंपाच्या वीजबिलाच्या वसुलीसाठी बळीराजाला वेठीस धरले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये महावितरण कंपनीबाबत नाराजीची भावना दिसून येत आहे.
हे पण वाचा : आता बांबू लागवडीसाठी मिळणार प्रति रोप 120 रुपयांच अनुदान
शेवगाव तालुक्यातील पूर्वभागातील चापडगाव, बोधेगाव, लाडजळगाव, गोळेगाव, राक्षी, वरखेड, मंगरूळ, अंतरवाली, बेलगाव, कोळगाव, आदी परिसरातील कोरडवाहू भागात शेती पंपासाठी ठराविकच कालावधीसाठी विजेचा वापर केला जातो. उन्हाळ्यात तर पाण्याचे सर्व स्त्रोत तळ गाठतात. महावितरणकडून सरासरी वीजबिल आकारले जात असल्याने थकबाकीमध्ये मोठी वाढ होत आहे.
हे पण वाचा : लोणचे उत्पादकांकडून लिंबाची खरेदी, पण दर दबावातच ; शेतकऱ्यांची चिंता कायम
चालू खरीप हंगाम संपून नुकताच रब्बी हंगाम सुरू झाला असताना व पेरणीची लगबग चालू असताना अतिवृष्टीच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला वीजबिलासाठी कोंडीत पकडण्याचा प्रकार महावितरणकडून होताना दिसत आहे. महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी विद्युतपुरवठा पुरवठा खंडित करण्यात येण्याच्या चर्चेने बळीराजा समोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
हे पण वाचा : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! पाऊण एकरावर सुरु केली पपई शेती, दोन लाखांची कमाई करत बनला लखपती
विद्युतपंप चालू होऊन अद्याप एक महिन्याचा कालवधीदेखील झाला नाही. तरीही वीजबिलाच्या वसुलीसाठी बळीराजाला वेठीस धरण्याचा प्रकार महावितरणकडून होत असल्याने बळीराजामध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे. शेती पंपासाठी कोणतेच वीज मीटर नसताना वीज वापरा कोणते निकष लावून वसुली केल॑ जाते, याबाबत मोठा गोंधळ असल्याचे दिसून येत आहे. चुकीच्या वसुली धोरणाबाबत ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
हे पण वाचा : सातबारा उतारा बनावट आहे की खरा ; ‘या’ पद्धतीने दोन मिनिटात ओळखा