बॉलिवूड कलाकारांची मूल शिकत असलेल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये किती फि भरावी लागते ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dhirubhai Ambani International School Fee : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही देशातील एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. ही शाळा देशातील नामांकित शाळांच्या यादीत येते. ही शाळा मुंबईमधील बांद्रा कुर्ला या भागात वसलेली आहे.

येथे अनेक बॉलीवूड कलाकारांची मुले शिक्षण घेतात. शाहरुख खान, करीना कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, शाहिद कपूर, क्रिकेटर रोहित शर्मा यांची मुले येथेच शिक्षण घेत आहेत.

अशा परिस्थितीत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल या शाळेची फि नेमकी किती आहे असा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान आता आपण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल या शाळेची फि नेमकी किती आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या शाळेत किंडर गार्डन पासून ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. या शाळेत नाव नोंदणीसाठी 5 हजार रुपये एवढी फि आहे.

पण एलकेजी ते सातवीपर्यंतच्या शिक्षणासाठी या शाळेत एक लाख 70 हजार रुपये एवढी फि लागते. तसेच आठवीपासून ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी एक लाख 80 हजार रुपये एवढी फी लागते.

म्हणजेच आठवी ते दहावीच्या शिक्षणासाठी एका वर्षासाठी 5 लाख 90 हजार रुपये एवढी फि द्यावी लागते.

तसेच अकरावी आणि बारावीच्या वर्गासाठी जवळपास वर्षाकाठी 9.65 लाख रुपये एवढी फी द्यावी लागत आहे. या शाळेत ऑडिटोरियम, भौतिकी, रसायण विज्ञान आणि जीव विज्ञान यांच्या लॅबोरेटरीज आहेत.

आर्ट रूम, परफॉर्मिंग आर्ट रूम, योगा रूम इत्यादी सुविधा आहेत. ही शाळा रिलायन्स इंडस्ट्रीजचे कुलपती धीरूभाई अंबानी यांच्या नावाने चालवली जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा