farmers news :- भारतात सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर खत टंचाई होणार असल्याची चिन्हे अधिच जाणवू लागली होती. त्यामुळे खताच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे.
त्याची झळ शेतकऱ्यांना बसू नये म्हणून केंद्र सरकारने या रासायनिक खतावर दिले जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशिया देशाकडून रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात आयात भारत देश करत असतो. पण रशिया – युक्रेन युद्धामुळे ही आयात अजूनही झालेली नाही.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील खताच्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे रासायनिक खताच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
‘डीऐपी’ खताच्या दरात 150 रुपयांनी वाढ झाली असून युरिया आणि इतर रासायनिक खतांच्या किंमतीत ही कमालीची वाढ झाली आहे.
तर ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर त्याचा अतिरिक्त ताण हा शेतकऱ्यावर पडणार असल्यामुळे हे सरकारला राजकीय दृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे केंद्र सरकारने पुढे येत आता रासायनिक खतावरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आधी 2020-21 मध्ये खताचे अनुदान हे 1 लाख 28 हजार कोटी रुपये होते. तेच आता सरकारने शेतकऱ्यांना रासायनिक खताच्या भाववाढीचा फटका बसू नये म्हणून हे अनुदान 1 लाख 50 हजार कोटीपर्यंत वाढवले आहे.
अनुदानात वाढ जरी केली असली तरी, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन आणि सहकार्य देखील केले जात आहे.