शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना स्वस्तात मिळणार डीएपी, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DAP Fertilizer Rate : येत्या दीड महिन्यात भारतात गरिबांना सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. जमिनीच्या मशागतीची कामे याआधीपासूनच सुरू करण्यात आली आहेत.

आता लवकरच शेतकरी बांधव बी बियाणे तसेच खत देखील खरेदी करणार आहेत. अशातच आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता कोणत्याही पिकाच्या दर्जेदार वाढीसाठी आणि चांगले उत्पादनासाठी पिकाला खताची नितांत आवश्यकता असते.

शेतकरी बांधव पिकाला युरिया तसेच डीएपी सारखी वेगवेगळी खते लावतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होत असते. पिकाच्या जोमदार वाढीसाठी नत्र स्फुरद आणि पालाश या तीन घटकांची अधिक आवश्यकता असते.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी गोड बातमी ! ‘हा’ मेट्रो मार्ग प्रकल्प आता लवकरच होणार पूर्ण; सिडको उभारणार प्रकल्प, शासनाचा हिरवा कंदील

आता या तीन घटकांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी बांधव DAP हे खत पिकाला देत असतात. डीएपी हे खत पीक वाढीसाठी अतिशय उपयुक्त असल्याने प्रत्येक पिकासाठी याची मागणी असते. परिणामी बाजारात अनेकदा या खताचा शॉर्टेज होतो. हे खत शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही शिवाय या खताचे दर देखील शेतकऱ्यांना परवडणारे नसतात.

मात्र आता नॅनो डीएपी म्हणजेच द्रव्य रूपात डीएपी उपलब्ध झाले आहे. हे नॅनो डीएपी आता या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे डीएपी कमी पैशात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील यामुळे डीएपीचा शॉर्टेज होणार नाही.

हे पण वाचा :- काय सांगता ! आता महाराष्ट्रात तलाठी राहणार नाही; तलाठी पद रिक्त करण्यासंदर्भात कृषीमंत्र्यांनी दिले मोठे संकेत

नॅनो डीएपी ची 500 एम एल ची बाटली ही एका डीएपीच्या गोणीप्रमाणे रिझल्ट देते. डीएपीची एक गोण ही तेराशे पन्नास रुपयाला मिळते आणि 500 एम एल नॅनो डीएपी ची बाटली हे मात्र सहाशे रुपयाला मिळणार आहे. अर्थातच शेतकऱ्यांचे जवळपास 850 रुपये प्रति बॅग वाचणार आहेत.

म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच नॅनो डीएपीचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता देखील कायम राहणार आहे आणि उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. जाणकार लोकांच्या मते नॅनो डीएपी वापरल्यास गुणवत्ता पौष्टिकता आणि उत्पादकता राखण्यास मदत होणार आहे. 

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ दोन शहरात लवकरच सुरु होणार वंदे मेट्रो, 1 रुपये प्रति किलोमीटर राहणार भाडे, पहा….

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा