Dairy Farming : मित्रांनो देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेती (Farming) समवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) मोठ्या प्रमाणात करत आहेत. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना शेतीला जोडधंदा म्हणून एखादा शेती पूरक व्यवसाय करण्याचा सल्ला देत असतात.
शेती पूरक व्यवसाय म्हणून आपल्या देशात पशुपालन (Animal Husbandry) हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील पशुपालन मोठ्या प्रमाणात करत असतात. पशुपालन आतून शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळत असल्याने शेतकरी बांधवांना याचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
मित्रांनो, मायबाप शासन देखील शेतकरी बांधवांनी पशुपालन व्यवसाय सुरू करावा यासाठी प्रोत्साहित करीत असते. या अनुषंगाने मायबाप शासन दरबारी वेगवेगळ्या योजना देखील कार्यान्वित केल्या जातात. मित्रांनो जर तुम्हाला देखील पशुपालन व्यवसाय करायचा असेल स्वतःचा डेअरी व्यवसाय करायचा असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. मित्रांनो आज आपण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पशुपालक शेतकरी बांधवांना दहा म्हशीचा डेरी फार्म सुरू करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून तब्बल सात लाखांचे कर्ज (Dairy Farming Loan) पशुपालक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. निश्चितच सात लाखांचे कर्ज घेऊन पशुपालक शेतकरी बांधव आपला स्वतःचा डेअरी व्यवसाय उभारू शकतात आणि चांगली कमाई देखील करू शकतात.
मित्रांनो शेतकरी बांधवांचे पण वाढावे या अनुषंगाने पशुपालन व्यवसायाला चालना देणे हेतू डेअरी उद्योजक विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी बांधवांना कर्जाची रक्कम उपलब्ध करून दिली जाते. हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेच्या माध्यमातून पशुपालक शेतकरी बांधवांना तब्बल सात लाखांचे कर्ज मिळणार आहे.
मित्रांनो जर आपणास देखील डेअरी व्यवसाय उभारायचा असेल आणि या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास राज्य सहकारी बँका, व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका त्याचबरोबर नाबार्डच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागणार आहे. मित्रांनो, डेअरी व्यवसायासाठी आपणास एक लाखापेक्षा अधिक कर्ज घ्यायचे असेल तर आपणास आपल्या जमिन गहाण ठेवावी लागणार आहे.