मराठवाड्यात आढळणाऱ्या ‘या’ जातीच्या म्हशीपासून मिळणार विक्रमी दूध उत्पादन ! एका वेतात देते 1200 लिटर दूध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dairy Farming Business : शेती आपल्या देशातला एक मुख्य व्यवसाय आहे. फार पूर्वीपासून देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. यामुळे आपल्या देशाला कृषिप्रधान देशाचा टॅग मिळालेला आहे.

अलीकडे मात्र शेतीचा व्यवसाय हा खूपच आव्हानात्मक बनला आहे. त्यामुळे कृषी तज्ञ फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीशी संबंधित शेती पूरक व्यवसाय देखील शेतकऱ्यांनी केले पाहिजेत असे मत व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांनी शेतीशी पूरक असणारा दुधाचा धंदा करावा जेणेकरून त्यांना अधिकची माई करता येईल असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

दरम्यान जर तुम्हीही दुधाचा धंदा करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे. कारंक की आज आपण म्हशीच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण मराठवाड्यात आढळणाऱ्या म्हशीच्या अशा एका देशी जातीची माहिती जाणून घेणार आहोत जी एका वेतात तब्बल बाराशे ते तेराशे लिटर पर्यंतचे दूध देण्यास सक्षम आहे.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना दुधाचा धंदा करायचा असेल त्या शेतकऱ्यांनी या जातीच्या म्हशीचे संगोपन केले तर त्यांना निश्चितच अधिकचे दूध उत्पादन मिळवता येणार आहे आणि त्यांची कमाई यामुळे वाढणार आहे.

म्हशीची मराठवाडी जात आहे खास

राज्यातील मराठवाडा विभागात प्रामुख्याने मराठवाडी या म्हशीच्या जातीचे संगोपन केले जाते. ही म्हशीची जात मराठवाडा व राज्यासहित इतरही राज्यातील काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाळली जात आहे.

ही मराठवाडी भुरी आणि काळ्या रंगाची असते. या जातीच्या म्हशीचे कपाळ रुंद आणि मान लहान असते. त्याची शिंगे मोठी व वक्र म्हणजे वाकलेली असतात.

ही म्हैस आकाराने मध्यम उंचीची असते. मराठवाडी म्हशींना विशेष आहार द्यावा लागत नाही. या म्हशीचे वजन 320 ते 400 किलोग्राम भरते.

ही म्हैस एका वेतात सरासरी 1200 ते 1300 लिटर एवढे दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा काही तज्ञांच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र यासाठी या म्हशीला चांगला पोषक आहार देणे आवश्यक आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा