Custard Apple Variety For Maharashtra : महाराष्ट्रासहित भारतात गेल्या काही वर्षांमध्ये फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डाळिंब, द्राक्ष, केळी, चिकू, जांभूळ, पेरू, सिताफळ अशा विविध फळ पिकांची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड होते. अलीकडे तर आपल्या राज्यात सफरचंद लागवडीचा प्रयोगही शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला आहे हे विशेष. तथापि अजूनही राज्यात सफरचंदची व्यावसायिक लागवड ही बाल्याअवस्थेत आहे.
मात्र भविष्यात कृषी शास्त्रज्ञ महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानात तग धरणाऱ्या सफरचंदाच्या जाती विकसित करतील अशी आशा आहे. यामुळे सहाजिकच सफरचंदासहित लागवड देखील आपल्या महाराष्ट्रासारख्या उष्ण राज्यांमध्ये वाढू शकणार आहे.
दरम्यान आपल्या राज्यात सिताफळ या उष्ण हवामानात चांगले उत्पादन देणाऱ्या फळाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. सिताफळ ची राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लागवड होत असून यापासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादनही मिळत आहे.
तथापि या जातीपासून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची आणि महाराष्ट्रातील हवामानात तग धरणाऱ्या आणि विक्रमी उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल आणि राज्याच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या नामांकित कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एका प्रमुख सीताफळ जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ही आहे सिताफळाची प्रमुख जात
फुले पुरंदर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संस्थेने विविध पिकांच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. फळांच्या देखील शेकडो जाती या विद्यापीठाने आत्तापर्यंत प्रसारित केल्या आहेत.
सिताफळाची फुले पुरंदर ही देखील अशीच एक जात आहे. या जातीची विशेषता म्हणजे महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल असून याची राज्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
या जातीचे फळ आकाराने मोठे असते. त्यामुळे बाजारात याला चांगली मागणी आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीचे फळ हे सरासरी 360 ते 380 ग्रॅम वजनाचे असते. काही फळे याहीपेक्षा अधिक वजनाचे आढळले आहेत.
ह्या जातीची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड होत असून दिवसेंदिवस या वाणाची लागवड वाढत चालली आहे. या जातीचे वैशिष्ट्ये पाहता भविष्यात या वाणाची लागवड आणखी वाढणार असा आशावाद व्यक्त होत आहे.