Orchard news : शेतकऱ्याकडे जर फळबाग असतील तर केवळ फळबागातूनच आर्थिक उत्पादन मिळते असे नाही, तर शेतकर्याला फळबागांमध्ये आंतरपीक घेऊन देखील अधिकचा नफा घेता येता. त्यासाठी आंतरपीक म्हणून कंद पिकाची योग्य निवड ठरले.
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये फळबागा घेतल्या जातात.
त्यात कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी मध्ये आंतरपीक म्हणून काही कंद वर्गीय पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. तर आंतरपीक म्हणून कंद पिकाची निवड केल्यास कमी कालावधीच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे.
कंद पिकासाठी वेगळे खत व पाणी व्यवस्थापन करावे. त्यामुळे मुख्य पिकाची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही.तर कंद पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करताना मुख्य फळपिकांच्या कामांमध्ये अडथळा होणार नाही याचे नियोजन असावे.
फळबागेत कंद पिकाची लागवड करण्यापूर्वी त्या पिकाला मुख्य पिकाप पासून आवश्यक असे अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी मूलभूत गोष्टींची मोठ्याप्रमाणावर स्पर्धा होणार नाही हे लक्षात घ्यावे.तर कंद पिकासाठी वेगळी खत पाणी व्यवस्थापन करून घ्यावे.
कोण कोणत्या पिकांमध्ये कंद पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करता येऊ शकते:
नारळ– सुरण, वडीचा अळू, आरारूट,घोरकंद,शेवरकंद,अळू
काजू – कनगर, घोरकंद,कारादांसरताळी
सुपारी – वडीचा अळू, घोरकंद, सुरण
आंतरपीक च्या सुधारित जाती:
कनगर – कोकण कांचन, श्री लता
करांदा – कोकण कालिका
सुरण – गजेंद्र
शेवर कंद – श्री जया, श्री विजया
घोरकंद – कोकणघोरकंद, श्री कार्तिकी
वडीचा अळू – कोकण हरितपर्णी
रताळी – कोकण अश्विनी, कमल सुंदरी
कंद पिकांची लागवड कशी करावी:
यासाठी बागेत 90 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. रताळी पिकासाठी 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या करून लागवड करावी.
रताळ्या सारख्या पिकामुळे जमिनीवर अच्छादन तयार होऊन जमिनीची धूप कमी होते तसेच पाणी मृदा संधारणाचे काम होते.अतिपावसाच्या प्रदेशात कंद पिकांची लागवड जमिनीचा उतार लक्षात घेऊन करावे.