Cucumber Farming : भारतात अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत देखील मोठा बदल केला आहे. आता शेतकरी बांधव पारंपारिक पिकांसमवेतच कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करू लागले आहेत.
आपल्या देशात काकडीचे देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. काकडी हे एक प्रमुख वेलवर्गीय पीक आहे. बाजारात उन्हाळ्यात काकडीला मोठी मागणी असते. यामुळे याच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला फायदाही मिळतो. अशा परिस्थितीत आज आपण काकडीच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्याही पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातीची लागवड करणे आवश्यक असते. काकडीच्या देखील सुधारित जातीची शेती घेण्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. आज आपण काकडीच्या सुवर्ण शितल या जातीची माहिती पाहणार आहोत.
सुवर्ण शीतल काकडीचे वाण ठरणार फायदेशीर
जर तुम्ही ही कमी कालावधीत चांगला नफा मिळवण्यासाठी काकडीची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर सुवर्ण शीतल हे काकडीचे वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या जातीच्या काकडीचा आकार हा मध्यम असतो.
जर समजा तुम्ही एक हेक्टर जमीन येते या जातीच्या वाणाची लागवड केली तर तुम्हाला जवळपास 300 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. पण उत्पादन हे सर्वस्वी जमिनीवर आणि शेतकऱ्यांच्या नियोजनावर अवलंबून राहणार आहे. तरीही जर योग्य नियोजन केले तर या जातीपासून 300 क्विंटल पर्यंतचे उत्पादनाचे टार्गेट सहज साध्य केले जाऊ शकते.
हे वाण अनेक रोगांना प्रतिकारक असल्याचा दावा देखील केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना या जातीच्या काकडीचे उत्पादन घेताना खूपच कमी उत्पादन खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे अल्प कालावधीत या जातीचे वाण परिपक्व होते. अवघ्या दोन ते सव्वादोन महिन्यात या जातीच्या काकडी पिकातून उत्पादन मिळायला सुरुवात होते.
उन्हाळी हंगामात जर याची लागवड करण्याचा विचार असेल तर मार्च महिना हा या जातीच्या लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर डोंगराळ भागात या जातीची लागवड केली तर मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने लागवडीसाठी योग्य ठरतात. परंतु मैदानी प्रदेशात मार्च महिन्यातच याची लागवड केली तर फायदेशीर ठरते.