CRPF Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. खरं पाहता अनेक तरुण सीआरपीएफ मध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहत असतात. अशा तरुणांसाठी ही तर एक आनंदाची पर्वणीच आहे. कारण की सीआरपीएफ ने तब्बल 9212 कॉन्स्टेबल (तांत्रिक/व्यापारी) पदांसाठी भरती काढली आहे.
याची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून यासाठीची अर्ज प्रक्रिया या महिन्याच्या अखेर सुरू होणार आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या भरतीसाठी 27 मार्चपासून अर्ज उमेदवारांना दाखल करता येणार आहेत. विशेष म्हणजे पदभरती अंतर्गत पुरुष आणि महिला अशा दोन्हीसाठी पदे उपलब्ध आहेत.
दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये पुरुषांसाठी आणि महिलांसाठी किती पदे आहेत, अर्ज कुठे आणि कसा करायचा, पदांची नावे आणि संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची दिनांक यांसारख्या सर्व बाबींची माहिती आता आपण जाणून घेऊया.
पुरुषांसाठी किती पदे आहेत
पुरुषांकरिता
चालक – 544, मोटर मेकॅनिक, मोची – 151 पदे, सुतार – 139 पदे, शिंपी – 242 पदे, ब्रास बँड – 172 पदे, पाईप बँड – 51 पदे, बगलर – १३४० पदे, माळी – 92 पदे, पेंटर – 56 पदे, कुक/WC – २४२९ पदे, वॉशरमन – 403 पदे, नाई – 303 पदे, सफाई कर्मचारी – ८११ पदे. अशा पद्धतीने पुरुषांची 9 हजार 105 पदे भरली जाणार आहेत.
महिलाची बगलर – 20 पदे, कुक/WC – 46 पदे, वॉशरमन – 03 पदे, हेअर ड्रेसर – 1 पोस्ट, सफाई कर्मचारी – १३ पदे, ब्रास बँड – 24 पदे, पायोनियर विंग – 11 पदे, मेसन – 06 पदे, प्लंबर – 01 पद, इलेक्ट्रिशियन – 04 पदे. अशा
पद्धतीने महिलांची एकूण 107 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा :- शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार या ठिकाणी बदल राहणार आहे. काही पदांसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. मात्र काही पदांसाठी संबंधित ट्रेड मधला आयटीआय पास असलेला उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या परिस्थितीत शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित इच्छुक उमेदवारांनी एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे. वयोमर्यादा बाबत बोलायचं झालं तर उमेदवार हा सर्वसाधारण गटात असेल तर 18 ते 27 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. पण एस सी आणि एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची सूट राहणार आहे सोबतच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची सूट राहील.
हे पण वाचा :- आता राजधानी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार वंदे भारत ट्रेन ?
परीक्षा फी किती राहील :- सीआरपीएफ ने आयोजित केलेल्या या भरतीसाठी शंभर रुपये परीक्षा फी सर्वसाधारण पुरुष उमेदवारांना राहणार आहे. परंतु महिला, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी परीक्षा फी माफ आहे.
अर्ज कुठे करायचा
सीआरपीएफने आयोजित केलेल्या या भरतीसाठी ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांना ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन या ठिकाणी करावं लागणार आहे. crpf.gov.in या सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
जाहिरात कुठे पाहणार
सीआरपीएफच्या या भरतीची अधिकृत अधिसूचना म्हणजे जाहिरात पाहण्यासाठी सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2023 या लिंक वर क्लिक करा.