काय सांगता ! गाईची ‘ही’ जात देते तब्बल 50 लिटरपर्यंत दुध, वाचा गाईच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Rearing : देशात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेती सोबतच अलीकडे पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. शेतकरी अलीकडे गाय पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.

गाय पालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे. गायीच्या सुधारित जातींचे संगोपन शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. शेती सोबतच हा व्यवसाय अतिरिक्त उत्पन्न मिळवून देत आहे.

शेतीशी संबंधित व्यवसाय असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मात्र गाय पालन व्यवसायातुन जर चांगली कमाई करायची असेल तर गाईच्या उत्कृष्ट ब्रीडचे संगोपन करणे आवश्यक आहे.

जर तुम्हीही पशुपालन करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एका उत्कृष्ट गायीची माहिती घेऊन आलो आहोत.

आज आपण गाईच्या एका अशा जातीची माहिती जाणून घेणार आहोत जी दिवसाला 50 ते 55 लिटर दूध देण्यास सक्षम आहे. या गाईला हरधेनु असे नाव देण्यात आले आहे. अ

मेरिकन गाईची जात होल्स्टीन फ्रीजन आणि साहिवाल या गाईचे संकर करून गाईची ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या जातीच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हरधेनू गाईच्या विशेषता 

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हरधेनू गाय दिवसाला 50 ते 55 लिटर दूध देते. ही गाय एका दिवसात 40 ते 50 किलो हिरवा चारा आणि 4 ते 5 किलो सुका चारा खाते.

याशिवाय ही गाय सुमारे 40-70 लिटर पाणी पिते. या जातीच्या गायी पाळण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त कष्ट करण्याची गरज नाही. कारण ही गाय कोणत्याही प्रकारचे तापमान सहज सहन करू शकते.

हरधेनू गाय सुमारे 20 महिन्यानंतर प्रजननासाठी तयार होत असते. हरधेनु गाय 30 महिन्यानंतर वासरांना जन्म देते. या गायींची दूध देण्याची क्षमता जास्त आहे.

त्यांच्या दुधातही चरबीचे म्हणजे फॅटचे प्रमाण देखील जास्त असते. परिणामी या जातीच्या गायीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा