‘या’ जातीच्या गाईचे संगोपन शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! एका वेतात देते 1800 लिटर दुध, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Rearing : देशात गाय पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शेती सोबतच गाय पालन हा व्यवसाय देखील शेतकऱ्यांसाठी लाभप्रद ठरत आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

पण गाय पालन व्यवसाय हा मुख्यत्वे दूध उत्पादनासाठी केला जातो. यामुळे या व्यवसायातून चांगली कमाई करण्यासाठी गाईच्या सुधारित जातींच्या संगोपन करणे आवश्यक आहे.

दरम्यान आज आपण गाईच्या एका विशेष लोकप्रिय जातीची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण कंकरेज जातीची गाईविषयी माहिती पाहणार आहोत.

खरेतर गिर गाई प्रमाणे ही सुद्धा देशातील सर्वात लोकप्रिय गाय म्हणून ओळखली जाते. याचे कारण म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना अधिकचे दूध उत्पादन मिळत आहे.

ही गाय दूध देण्याबरोबरच शेतीची कामेही सहजतेने करते.ही गाय एका वेतात सरासरी १८०० लिटर दूध देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या जातीचे बैल हे शेती कामासाठी उत्कृष्ट असतात. यामुळे या जातीच्या बैलांना बाजारात मागणी असते. कांकरेज गाय वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.

कांकरेज गायीची जात सिल्व्हर-ग्रे, लोखंडी राखाडी किंवा स्टील ग्रे रंगाची असते. या गायीचे शिंग लांब आणि खूप मजबूत असतात.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकरेज गाय एका दिवसात सुमारे 8 ते 10 लिटर दूध देण्यास सक्षम आहे.

त्याच वेळी, या जातीची गाय एका स्तनपानात म्हणजे वेतात सुमारे 1750 ते 1800 लिटर दूध देते. या गाईचे दूध सहज पचते. मानवी शरीरासाठी या गाईचे दूध खूपच फायदेशीर आहे.

कांकरेज गाईच्या दुधात ४.५ टक्के फॅट आढळतो. त्यामुळे बाजारात या गाईच्या दुधाला मोठी मागणी आहे. परिणामी या गाईचे संगोपन केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा