Cow Farming : भारतात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीसोबतच दुधाचा धंदा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दुधाचा धंदा हा शेतीशी निगडित असा व्यवसाय आहे आणि याला ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असेही म्हटले जाते. आपल्या राज्यातही अनेक शेतकरी बांधव दुधाचा व्यवसाय करतात.
यासाठी गाय आणि म्हशीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. दरम्यान, जर तुम्हालाही दुधाचा धंदा सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण गायीच्या टॉप 3 जातींची माहिती पाहणार आहोत.
विशेष बाब अशी की आपण ज्या गाईच्या जातीची माहिती पाहणार आहोत त्या गायी विक्रमी दुध उत्पादनासाठी ओळखल्या जातात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया गायीच्या टॉप तीन जाती.
हॉलिस्टन फ्रिजियन : गाईची ही जात डेन्मार्क मधील आहे. ही गाईची एक विदेशी जात आहे. मात्र आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये या जातीच्या गायीचे संगोपन केले जाते. भारतातील हवामान या जातीच्या गाईला विशेष मानवते.
या जातीपासून चांगले दूध उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. दिवसाला 40 लिटर पर्यंतचे दूध या गाईपासून मिळवता येऊ शकते. या गाईची किंमत जवळपास 60 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.
साहिवाल गाय : ही भारतातील गायींच्या उत्तम जातींपैकी एक आहे. ही एक देशी जात आहे. ही गाय प्रामुख्याने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात अधिक दिसून येते.
चांगली गोष्ट म्हणजे बिहार, महाराष्ट्र अशा भागातही या जातीचे संगोपन केले जाते. दररोज वीस ते पंचवीस लिटर पर्यंतचे दूध या जातीपासून सहजतेने मिळवता येऊ शकते.
गीर गाय : ही भारतातील सर्वात जास्त दुधाळ गाय मानली जाते. सर्वाधिक दूध उत्पादन देणाऱ्या या जातीचे पालन भारतातील अनेक राज्यांमध्ये केले जाते. विदेशातही या जातीचे संगोपन केले जाते. ही गाय एका दिवसात 30 ते 50 लिटर दूध देते.
ही एक देशी गाय आहे. म्हणजे भारत हे या गाईचे मूळ ठिकाण आहे. या गायीचे मूळ ठिकाण काठियावाड (गुजरात) च्या दक्षिणेला गीर जंगल आहे. गिर गायीची किंमत ही साठ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत असते.