Cotton Variety : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये 28 मे ते 3 जून या कालावधीत दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच आपल्या राज्यात यंदा वेळेवरच मान्सून आगमन होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आठ जूनच्या सुमारास आगमन होणार असा अंदाज आहे. यंदा पुण्यात नऊ ते दहा जूनच्या आसपास आणि राजधानी मुंबईत 11 जून च्या आसपास मान्सून सलामी देणार असे बोलले जात आहे.
दरम्यान मान्सून आगमन झाल्यानंतर राज्यात खरीप हंगामातील पीक पेरणीला वेग येणार आहे. मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर कपाशी पेरणी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. दरम्यान, आज आपण कपाशीच्या टॉप 5 जातींची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
कपाशीचे टॉप 5 वाण
अजित सीड्स कंपनीचे अजित 5 BG II : जर तुम्ही कोरडवाहू जमिनीत कपाशी लागवड करणार असाल तर अजित सीड्स कंपनीचे हे वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.
धरती सीड्स कंपनीचे Ankur Narayan BG II म्हणजे मिरीट : जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार धरती सीड्स कंपनीची ही जात कोरडवाहू जमिनीत लागवडीसाठी उत्तम असल्याचे आढळून आले आहे.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे शेतकरी बांधव याची तीन बाय दोन, तीन बाय एक, साडेतीन बाय एक या अंतरावर लागवड करू शकतात.
प्रभात सीड्स कंपनीची सुपर कॉट : महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सुपरकॉट या जातीची लागवड करतात. अधिक उत्पादनासाठी ओळखली जाणारी ही जात कोरडवाहू जमिनीत लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
Nuziveedu Seeds कंपनीची नवनीत : कोरडवाहू जमिनीत लागवडीसाठी कापसाचे आणखी एक सुधारित जात म्हणजेच नवनीत. या जातीची राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही भागांमध्ये लागवड होत असल्याचे पाहायला मिळतं आहे.
जर तुम्हीही कोरडवाहू जमिनीत यंदा कपाशी लावण्याचा प्लॅन बनवत असाल तर या जातीची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
NBC-10 : एन बी सी 10 या जातीची देखील कोरडवाहू जमिनीत लागवड केली जाऊ शकते. राज्यातील हवामान या जातीच्या पिकासाठी अनुकूल असल्याचे आढळले आहे. यामुळे जर तुम्हालाही यंदा कपाशी लागवड करायची असेल तर या वाणाची तुम्ही निवड करू शकता.