Cotton Price : महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कापूस या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र या हंगामात कापसाचे दर गेल्या दोन महिन्यांपासून दबावात आहेत. यामुळे कापूस उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे. हंगामाची सुरुवात विजयादशमीला झाली तेव्हा कापसाला चांगला दर मिळत होता.
राज्यातील बहुतांशी एपीएमसी मध्ये मुहूर्ताच्या कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना यंदा उत्पादनात घट झाली तरीदेखील वाढीव दरातून ही घट भरून निघेल आणि पदरी चार पैसे अधिक शिल्लक राहतील अशी आशा होती. विशेष बाब म्हणजे गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाला असल्याने या हंगामात कपाशीची लागवड देखील वाढली होती. पण मुहूर्ताच्या कापसाला जो दर मिळाला तो कायम राहिला नाही.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल ते 9500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळत होता. विशेष म्हणजे हा दर देखील अधिक काळ टिकू शकला नाही. डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून कापूस दरातील घसरण वाढतच गेली.
डिसेंबर महिन्यात कापूस 7000 पर्यंत खाली आला. पण पुन्हा जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात कापूस दरात थोडीशी झळाळी पाहायला मिळाली. कापसाचे दर अकोट सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9000 वर गेले. पण दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा कापूस दरात घसरण झाली.
कापसाचे दर आठ हजारावर आले. तेव्हापासून कापूस 8000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल अशा सरासरी बाजारभावात विकला जात आहे. यामुळे कापसाला चांगला विक्रमी दर या हंगामात मिळेल ही शेतकऱ्यांची भोळी भाबडी आशा धुळीला मिळाली आहे. दरम्यान आजही कापसाचे दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच पाहायला मिळाले आहेत.
मात्र तज्ञ लोकांनी कापसाचे वायदे पुन्हा एकदा सुरू झाले असल्याने आणि जागतिक उत्पादनात घट अमेरिकेकडून वर्तवण्यात आली असल्याने आगामी काही दिवसात दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे आता मार्च अखेर कापसाला काय भाव मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सध्या कापसाला काय भाव मिळतं आहे? याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यात सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला ? सविस्तर बाजारभाव वाचण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करा