यंदा पांढरे सोने शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! 2023-24 मध्ये कापसाला 12 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : गेला कापूस हंगाम विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू झाला होता. अनेक भागात दसऱ्याला आलेल्या मुहूर्ताच्या कापसाला अकरा हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. मात्र यानंतर दरात घसरण झाली. मध्यंतरी कापूस आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दरात विकला जात होता.

यानंतर पुन्हा दरात घसरण झाली आणि कापसाचे भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आलेत. यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. यामुळे यंदा कापसाची लागवड घटणार असा अंदाज होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून यावर्षीही कापसाचीच लागवड करावी लागली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान यावर्षी देखील कापसाला गेल्या वर्षी प्रमाणेच कमी भाव मिळणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. अशातच मात्र काही बाजार अभ्यासकांनी कापूस हंगाम 2023-24 मध्ये कापसाला चांगला भाव मिळू शकतो असे मत व्यक्त केले आहे. बाजार अभ्यासकांच्या मते यावर्षी भारतात अगदी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे तसेच आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने या वर्षी देशातील उत्पादनात घट येण्याची भीती आहे. भारतासोबतच प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्रात देखील कापसाच्या उत्पादनात घट येणार आहे. अमेरिका, चीन, ब्राझील यांसारख्या प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्रांमध्ये कापसाचे उत्पादन कमी राहणार असा अंदाज आहे.

विशेष बाब अशी की अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक उत्पादनात 6% घट येणार असा अंदाज व्यक्त केला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक उत्पादनात अमेरिका, चीन, ब्राझील आणि भारत या चार देशांचा 70 टक्के वाटा असून याच महत्त्वाच्या देशात यंदा कापसाचे उत्पादन कमी राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

एकट्या चीनमध्ये कापसाचे 12 टक्के उत्पादन कमी होणार आहे. भारतात देखील तशीच परिस्थिती राहणार असून चीन आणि भारतात कापसाचा वापर वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी आणि वापर अधिक यामुळे पुरवठा आणि मागणीमध्ये तफावत निर्माण होईल आणि बाजारभावात यंदा चांगली तेजी राहील असा अंदाज आहे.

मात्र असे असले तरी आतापासूनच कापसाला चांगला भाव मिळेल याबाबत ठामपणे सांगता येऊ शकत नाही. सध्या कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत असून आगामी काळात कापसाचे किती उत्पादन मिळते यावरच कापसाचे बाजार भाव अवलंबून राहणार आहेत.

पण जर कापसाच्या उत्पादनात विक्रमी घट झाली तर कापसाला समाधानकारक भाव मिळू शकतो. यामुळे आता आगामी काळात कापसाचे जागतिक उत्पादन काय राहते यावरच कापसाचा बाजार भाव अवलंबून राहणार असल्याचे सांगितले जात आहे.