यंदा पांढर सोनं मालामाल बनवणार ? ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कापसाला काय भाव मिळणार ? तज्ञांनी दिली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : सध्या राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक भागात नवीन कापसाची आवक होत आहे. ज्या भागातील शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होती त्यांनी पूर्व मौसमी हंगामात कापूस लागवड केली होती. याच पूर्व हंगामी कापसाची सध्या हार्वेस्टिंग सुरू आहे.

काही शेतकरी हार्वेस्टिंग नंतर बाजारात नवीन माल विक्रीसाठी नेत आहेत. काही भागात खेडा खरेदी देखील सुरू झाली आहे. मात्र काही ठिकाणी कापसाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. नवीन कापसामध्ये मोठ्या प्रमाणात आद्रता आणि ओलावा असल्याने कमी दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

तर काही ठिकाणी हमीभावापेक्षा किंचित बाजारभाव अधिक आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे अजून कापसाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी आर्वी येथील एपीएमसी मध्ये कापसाला किमान 7300, कमाल 7350 आणि सरासरी 7320 रुपये एवढा भाव मिळाला आहे.

तसेच सात ऑक्टोबरला राज्यातील खामगाव एपीएमसी मध्ये कापसाला सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. खर तर कापसाला सात हजार 20 रुपये एवढा हमीभाव देण्यात आला आहे. याचाच अर्थ राज्यातील काही बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.

त्यामुळे यंदा कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान यंदा जागतिक कापूस उत्पादन किंचित वाढू शकते असा अंदाज आहे. कापसाचे युनायटेड स्टेट मध्ये अधिक उत्पादन होणार आहे.

परंतु चीन, तुर्कस्तान, पाकिस्तान या देशांमध्ये कापसाचे उत्पादन घटणार असा अंदाज आहे. अशातच राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाचा बाजार दुखीवर विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कापसाला काय भाव मिळू शकतो याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कापसाला सात हजार 500 ते आठ हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळू शकतो.  एकंदरीत सध्याच्या बाजारभावात भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

परंतु हा फक्त अंदाज आहे कापसाचे बाजार भाव सर्वस्वी उत्पादनावर आणि मागणीवर अवलंबून राहणार आहे. मात्र भविष्यात कापूस दरवाढीची शक्यता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा