Cotton Rate Maharashtra : महाराष्ट्रातील अनेक प्रमुख बाजारांमध्ये कापसाला सध्या 7200 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळतोयं. अर्थातच राज्यातील बहुतांशी बाजारात पांढऱ्या सोन्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोयं.
यामुळे मात्र कॉटन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेकांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये, ही वास्तविकता पाहायला मिळतं आहे.
खरेतर केंद्रातील मोदी सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला या हंगामात 7 हजार 121 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला 07 हजार 521 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. अर्थातच राज्यातील अनेक बाजारात कापसाला हमीभाव मिळतं नाहीये.
काही अपवाद वगळता राज्यातील बाजारात कापसाचे दर हे मिनिमम सपोर्ट प्राईस पेक्षा कमीच आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आले असून कापसाच्या बाजार भावात आगामी काळात वाढ होणार की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय.
अशातच मात्र बाजारातील अभ्यासक लोकांनी आगामी वर्षात अर्थातच 2025 मध्ये कापूस बाजार भाव सुधारणा होईल असा अंदाज दिला आहे. बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे जानेवारी ते मार्च 2025 या काळात कापसाला सरासरी 7500 ते 8500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळण्याची शक्यता आहे.
नक्कीच या व्यावसायिक पिकाच्या बाजारभावात वाढ झाली तर याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कापूस हे व्यावसायिक पीक म्हणजेच नगदी पीक राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते.
या पिकाची राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. सध्या स्थितीला मात्र कापसाचे दर फारच दबावत आहेत.
परंतु कापूस बाजारावरील हा दबाव लवकरच कमी होईल आणि कापसाचे दर वाढतील अशी आशा आता तज्ञांनी व्यक्त केली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदात पल्लवीत झाल्या आहेत.
बाजारातील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च 2022 मध्ये कापसाला 9545, जानेवारी ते मार्च 2023 मध्ये कापसाला 8 हजार 80 आणि जानेवारी ते मार्च 2024 मध्ये कापसाला 7120 असा दर मिळाला आहे.
मात्र यावर्षी अर्थातच जानेवारी तो मार्च 2025 मध्ये कापसाला 7500 ते 8500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.