काय सांगता ! पाकिस्तान अन बांगलादेशमुळे भारतीय कापसाला चांगला भाव मिळत नाहीये; भविष्यात पांढरं सोन तेजीत येणार की नाही ? पहा काय म्हटले तज्ञ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : नुकताच राज्यासह संपूर्ण देशात लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे बाजारात कपड्यांची मागणी वाढणार आहे. यामुळे सुताच्या मागणीत आणि परिणामी कापूस मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. पण, सध्या बाजारात अस होत नाहीये. म्हणून पांढर सोनं सध्या मंदीत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतात कापसाला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. त्यावेळी कापूस तब्बल दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल दरात विकला गेला. मात्र तदनंतर बाजारात पांढरे सोन्याला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. गेल्या हंगामात देखील मालाला चांगला भाव मिळाला नव्हता.

शिवाय या चालू हंगामाची सुरुवातही शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरली आहे. यंदा कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. काही शेतकऱ्यांना एकरी मात्र दोन ते तीन क्विंटलचा उतारा मिळणार असे चित्र पाहायला मिळत आहे.

अशा स्थितीत यंदा किमान 12 हजाराचा भाव कापसाला मिळाला पाहिजे अशी भोळीबाबडी आशा शेतकऱ्यांची आहे. पण, सध्या बाजारात कापसाला फक्त सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 7200 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. परिणामी, यंदा कापूस उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

एकतर कमी पावसामुळे, विविध रोगांमुळे आणि कीटकांमुळे कापसाच्या उत्पादनात घट येण्याची भीती आहे तर दुसरीकडे बाजारात कापसाला खूपच कमी भाव मिळत आहे. यामुळे यंदा पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरम्यान जाणकार लोकांनी, जागतिक बाजारात उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात सूत उपलब्ध असल्याने बाजारभाव मंदीत असल्याचे सांगितले आहे. भारताचे सूत हे इतर देशांच्या सुतापेक्षा महाग आहे. परिणामी भारताच्या सुताची मागणी कमी आहे.

बांगलादेश भारतातून मोठ्या प्रमाणात सूत आयात करत असतो. पण गेल्या काही महिन्यांपासून तेथील आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यामुळे बांगलादेश मधून भारतीय सुताची मागणी कमी झाली आहे.

फक्त बांगलादेशच नाही तर पाकिस्तान, चीन, जपान, इंडोनेशिया या देशांमधूनही भारतीय सुताला फारशी मागणी नसल्याचे बाजार अभ्यासकांनी सांगितले आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कापूस बाजार भाव दबावत आले आहेत.

दरम्यान आता कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. यामुळे आतापर्यंत देशातील फक्त 40% जिनिंग सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे आगामी काळातही कापसाचे भाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत नसल्याचा अंदाज बाजार अभ्यासकांनी बांधला आहे.

यामुळे शेतकरी बांधवांनी बाजाराचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने आपल्या मालाचे विक्रीचे नियोजन करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे आता कापूस उत्पादक काय निर्णय घेतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा