Cotton Rate : कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रासहित देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये केली जाते. पण कापसाचे पीक गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापसाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.
गेल्या हंगामात बाजारात कापूस कवडीमोल भावात विकला गेला होता. यंदा देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळतं आहे. यंदाचा हंगाम विजयादशमीपासून सुरू झाला असून तेव्हापासून पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे भाव दबावात आहेत.
अशातच मात्र उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कापसाच्या बाजारभावात थोडी तेजी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रासहित देशातील अनेक बाजारांमध्ये बाजारभावाने 7500 रुपयांचा टप्पा गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून आगामी काळात भाव वाढ होईल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
विशेष बाब अशी की जाणकार लोकांनी देखील भविष्यात कापसाला काय भाव मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कापसाचे भाव गेल्या काही दिवसांशी तुलना केली असता तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
बाजारभाव एम एस पी पेक्षा अर्थातच हमीभावापेक्षा अधिक झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय.
दुसरीकडे चांगल्या क्वालिटीच्या मालाला 7000 रुपये प्रति क्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. काही बाजारात यापेक्षा अधिक दर नमूद केला गेला आहे. यामुळे जवळपास तीन ते साडेतीन महिन्यानंतर आत्ता कुठे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चमक पाहायला मिळत आहे.
सध्याचा भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढा नाही मात्र जाणकार लोकांनी भविष्यात कापसाचे भाव 8000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठतील असा विश्वास यावेळी बोलून दाखवला आहे. यासाठी मात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी लागणार आहे.
राज्याच्या प्रमुख बाजारात कापसाचा भाव किती ?
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा भाव – 7500 रुपये प्रति क्विंटल
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचा भाव – 7339 रुपये प्रति क्विंटल
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा भाव – 7300 रुपये प्रति क्विंटल
चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचा भाव – 7051 रुपये प्रति क्विंटल