Cotton Rate : खरीप हंगामात (Kharif Season) कापसाच्या लागवड (Cotton Farming) क्षेत्रात कमालीची घट झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनात (Cotton Production) मोठी कपात झाली होती.
याशिवाय खरीप हंगामात बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळ्या रोगानी देखील कापसाच्या पिकावर आक्रमण केले होते यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणार हे शेतकऱ्यांना (Farmer) देखील ठाऊक होते.
झालं ही तसचं एकीकडे कापसाच्या उत्पादनात घट झाली आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला (Cotton) मोठी मागणी आली. यामुळे या खरिपात कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी दर मिळाला.
कापसाने (Cotton Price) संपूर्ण राज्यात बारा हजारांच्या घरात उडी मारली होती. यामुळे गदगद झालेल्या कापूस उत्पादकांनी भविष्यातील धोका बाजूला सारून फरदड उत्पादन घेतले.
विशेष म्हणजे वारंवार महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने (Maharashtra State Agriculture Department) कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Grower Farmer) फरदड उत्पादन टाळण्याचा सल्ला दिलामात्र कृषी विभागाचा सल्ला नजरेआड करून खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात फरदड कापसाचे उत्पादन घेतले गेले.
खानदेश प्रमाणेच राज्यातील इतरही भागात काहीशी अशीच परिस्थिती बघायला मिळाली. कृषी विभागाच्या मते, कापसाच्या पूर्ण वेचण्या झाल्यानंतर देखील वावरात कापूस तसाच उभा राहू देणे म्हणजेच गुलाबी बोंड अळीला निमंत्रण देणे अर्थातच फरदड कापसाचे उत्पादन घेतले म्हणजे पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचे सावट प्रकर्षाने बघायला मिळू शकते.
यामुळे जळगाव जिल्हा कृषी विभागाने एक विशिष्ट मोहीम देखील राबवली होती या मोहिमेद्वारे कापूस काढून टाकण्याबाबत शेतकऱ्यांना अवगत केले गेले होते.
मात्र, कापसाला मिळत असलेल्या उच्चांकी दर यामुळे कापूस उत्पादकांनी फरदड घेणे काही टाळले नाही. यामुळे शेतकऱ्यांना सध्या चांगला फायदा होताना देखील बघायला मिळत आहे.
शेतकऱ्यांनी अतिशय अत्यल्प खर्चात एकरी चार ते पाच क्विंटल फरदड कापसाचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे फरदड कापसाला देखील नव्या कापसा प्रमाणे चांगला दर मिळत आहे. स
ध्या फरदड कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. यामुळे शेतकर्यांना मोठ आर्थिक सहाय्य होत असून अडचणीच्या काळात हात खर्चाला पैसे उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे.
आता मे महिन्यात लागवड करू नका
लांबलेला कापूस हंगाम व फरदड घेतल्याने अधिक काळ कापुस शेतात राहिला. यामुळे कपाशी पिकावर अपायकारक किडीचा विशेषता गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम अखंडित राहण्याची शक्यता आहे.
यामुळे चालू खरीप हंगामात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता कृषी विभागाकडून तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
यामुळे कपाशीवरील सर्वात नुकसानदायक कीड म्हणजे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव या येत्या हंगामात नियंत्रणात आणण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात जमिनीची खोल नांगरट करावी आणि कापूस पिकाची मे महिन्यात होणारी पूर्वहंगामी लागवड टाळण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कापूस उत्पादकांनी फरदड कापसाबाबत कृषी विभागाचा सल्ला नजरेआड केला. मात्र, आता तरी कृषी विभागाचा हा सल्ला शेतकरी बांधव ऐकतील आणि कापसाची लागवड कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे मे महिन्यात करणार नाहीत आणि येत्या खरीपात देखील मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन बघायला मिळेल.