Cotton New BT Variety : कापूस हे महाराष्ट्र, गुजरातसहित विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. कापूस लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्रात कापसाची सर्वात जास्त लागवड होते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र विभागात कापसाची सर्वाधीक लागवड होते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांना कापूस पिकातून फारसे उत्पादन मिळतं नाहीये. महाराष्ट्रात तर कापूस पीक उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
अशातच आता राज्यासहित संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादकांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी बाजारात आता नवीन बीटी वाण दाखल होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच कापसाच्या नव्या बीटी तणनाशक सहनशील बोलगार्ड ३ वाणाला मंजुरी मिळणार असे संकेत मिळतं आहेत.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनीचं असे संकेत दिले आहेत. खरतर बीटी 2 हे बोंड आळी प्रतिबंधात्मक वाण आहे. मात्र आता या वाणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, देशात सध्या बीटी बोलगार्ड ३ कापसाची चाचणी सुरू आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदे (आयसीएआर) त्याचे मूल्यांकन करत आहे. यामुळे लवकरच आयसीएआरकडून याला मंजुरी मिळू शकते असे त्यांनी म्हटले आहे.
या बीटी 3 वाणाला आयसीएआरकडून मान्यता मिळाल्यानंतर लागवडीस परवानगी दिली जाऊ शकते, असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे.
निश्चितच जर बीटी तीन कापूस वाण बाजारात दाखल झाले तर याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
यामुळे कापूस पीक उत्पादित करण्यासाठी लागणारा खर्च देखील कमी होऊ शकतो अशी आशा आहे. या नवीन वाणावर गुलाब बोंड अळीचा देखील प्रादुर्भाव होणार नाही असे म्हटले जात आहे.