Cotton Farming : कापूसं हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीन विभागात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. या व्यतिरिक्त राज्यातील इतरही विभागात या पिकाची लागवड कमी अधिक प्रमाणात केली जाते.
एकंदरीत काय तर या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे अवलंबून आहे. मात्र असे असले तरी या पिकाची शेती काळाच्या ओघात मोठी आव्हानात्मक बनली आहे. खरं पाहता कापूस शेतीसाठी मजुरीवर सर्वाधिक खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. यामध्ये सर्वाधिक खर्च हा कापूस वेचणीवर होत असतो.
तसेच आता कापूस वेचणीसाठी मजुरांचा अभाव होत असल्याने वेळेवर कापूस वेचणी होत नाही शिवाय मजुरांना अधिक मजुरी द्यावी लागते यामुळे कुठे ना कुठे कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी कापूस वेचणीसाठी एक भन्नाट असं यंत्र तयार करण्यासाठी कंबर कसली आहे.
या विद्यापीठाने रोबोटिक वेचणी यंत्र तयार करणे हेतू एका खाजगी कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की कापूस पिक वेचणीच्या अवस्थेत असताना जर अवकाळी पाऊस कोसळला तर पिकाचे मोठे नुकसान होते. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव वेळेत कापूस वेचणी करण्यासाठी नियोजन आखत असतात.
आता एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांचा कापूस वेचणीसाठी येत असल्याने मजूर टंचाई निर्माण होते. अशातच जर अवकाळी पाऊस कोसळला तर शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा घटना वारंवार समोर देखील आल्या आहेत. हेच कारण आहे की अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने रोबोटिक वेचणी यंत्र डेव्हलप करण्यासाठी कंपनीसोबत करार केला आहे.
अशी माहिती कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर विलास खर्चे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या आधी कापूस वेचणी करण्यासाठी यंत्राची निर्मिती झाली नाही असं नव्हे तर या आधी देखील कृषी विद्यापीठाने कापूस वेचणीसाठी यंत्र तयार केले आहे. मात्र पूर्वीचे यंत्र हे कापसासोबत कचऱ्याची देखील मोठ्या प्रमाणात वेचणी करत आहे.
यामुळे कापसाची प्रत खराब होते आणि दर कमी मिळतो. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठाने आता रोबोटिक कापूस वेचणी यंत्र तयार करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी एका प्रायव्हेट कंपनीसोबत सामंजस्य करार देखील झाला आहे. हे यंत्र तयार झालं तर कापूस वेचणीसाठी कापूस उत्पादकांना मोठा फायदा होईल आणि मजुरी पेक्षा यंत्राचा कमी राहील असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.