शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापसाचे नवीन वाण विकसित, कमी खर्चात मिळणार अधिकचे उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. राज्यात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.

जळगावसह संपूर्ण खानदेश, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात कापसाचे शेती केली जाते. या पिकाला पांढर सोने म्हणून ओळखतात.

या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. शिवाय उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे.

बियाणे, खत, औषध अशा इत्यादी कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्या असल्याने आणि मजुरीचे दर वाढले असल्याने आता कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. विशेष म्हणजे मालाला अपेक्षित असा भावही मिळत नाहीये.

यामुळे राज्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आता कापसाला पर्यायी पीक शोधण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे मराठवाडा कृषि विद्यापीठाने कापसाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. चक्क आठ वर्षांच्या मेहनतीनंतर मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या नांदेड कृषी संशोधन केंद्राने कापसाचे तीन नवीन बीटी वाण विकसित केले आहेत.

या नव्याने विकसित झालेल्या कापसाच्या वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार असा दावा केला जात आहे. एन.एच.1901, एन.एच.1902 आणि एन.एच.1904 या कापसाच्या तीन नवीन जाती तयार करण्यात आल्या आहेत.

कापसाचे हे नवीन वाण सरळ प्रकारातील आहेत. अर्थातच या जातीपासून चालू वर्षाच्या हंगामात मिळालेले बियाणे पुढील वर्षी वापरले जाऊ शकते. परिणामी शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे साठी हजार रुपये खर्च करण्याची गरज राहणार नाही.

यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे. विशेष म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 16 ते 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकणार आहे. हे वाण कोरडवाहू भागात सुद्धा उपयुक्त राहणार आहे.

या जातींवर रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात होणार आहे. हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. दरम्यान येत्या काही महिन्यांमध्ये हा वाण बाजारात उपलब्ध होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा